Nashik News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा डोळा मारला. त्याचे व्हिडिओ आणि चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. यापूर्वी अजितदादा विरोधी पक्षनेते असताना विधीमंडळात ते पत्रकारांशी बोलत होते, त्याचवेळी उद्धव ठाकरे आले होते, त्यावेळी पवारांनी डोळा मारला होता, त्यामुळे अजित पवार यांच्या या कृतीची जोरदार चर्चा होत आहे. ( Deputy Chief Minister Ajit Pawar's action discussed in Nashik)
शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज नाशिकमध्ये (Nashik) आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि नेतेमंडळींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषदही घेतली. त्या पत्रकार परिषदेदरम्यान अजितदादांनी पुन्हा एकदा डोळा मिचकवला. त्याबाबतचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हावर दावा करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला हेाता. त्यावर त्यांनी तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही का काळजी करता. निवडणुकीच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत एबी फॉर्म आणि चिन्ह द्यावं लागतं. तोपर्यंत सर्व गोष्टीसंदर्भात तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल, असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी डोळा मारला, त्याची चर्चा आत रंगली आहे.
दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये असतानाही एकदा अजित पवार यांनी डोळा मारला होता. अधिवेशनाच्या काळात विधीमंडळात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अचानकपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे त्या पत्रकार परिषदेत आगमन झाले होते. त्यावेळी बाजूला झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकाराकडे पाहून डोळा मारला हेाता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.