Amit Gorkhe, Yogesh Tilekar Sarkarnama
विशेष

Pune BJP Politics : विधान परिषदेत 'पहिली पसंत' पुणे, पिंपरी चिंचवडला; योगेश टिळेकर, अमित गोरखेंचा दणक्यात विजय

Devendra Fadnavis, Amit Gorkhe, Yogesh Tilekar : गोरखे यांच्या रुपाने उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा विधान परिषदेत दुसरे आमदार झाले आहेत.

Uttam Kute

Pune Political News : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (ता. 12) मतदान झाले. त्यात भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. त्यात पुण्यातील हडपसरचे योगेश टिळेकर आणि पिंपरी-चिंचवडचे अमित गोरखे यांचा समावेश आहे. त्यांना विजयी मतांच्या कोट्यापेक्षा (23) तीन मते जास्त मिळाली आहे तेही पहिल्या पसंतीची.

गोरखे यांच्या रुपाने उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा विधान परिषदेत दुसरे आमदार झाले आहेत. दोन वर्षापूर्वी शहरातील उमा खापरे या विधान परिषदेवर निवडून गेल्या आहेत. त्यानंतर गोरखे हे दुसरे एकनिष्ठ भाजपाई तेथे निवडून गेल्याने शहराचे आता पाच आमदार झाले आहेत. भाजपचे महेश लांडगे (भोसरी), अश्विनी जगताप (चिंचवड), तर अजित पवार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे (पिंपरी) हे विधानसभेचे या टर्मचे आमदार आहेत.

गोरखे हे पहिल्याच फेरीत विजयी झाले. त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांना कोट्यापेक्षा तीन जास्त म्हणजे 26 मते मिळाली. त्यांच्याच पक्षाचे पुणेकर योगेश टिळेकर हे मतांचा कोटा पूर्ण करीत प्रथम विजयी झाले.

त्यांच्यानंतर भाजपच्या मुंडे, परिणय फुके, राजेश विटेकर (23) शिवाजीराव गर्जे (24) या अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजयाची पताका फडकावली. त्यानंतर गोरखे, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिंदे शिवसेनेच्या भावना गवळी (24), कृपाल तुमाने (25) आणि भाजपचे सदाभाऊ खोत Sadabhau Khot (26) यांनी विजय मिळवला. हे दोघेही माजी खासदार असून गत लोकसभेला त्यांचे तिकिट कापण्यात आले होते. त्यानंतर लगेचच त्यांचे पुनर्वसन अशाप्रकारे केले गेले.

महायुतीचे नऊपैकी नऊ उमेदवार विजयी झाले. तर,आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. पहिल्या फेरीत विजयी मतांचा कोटा पूर्ण न केल्याने शरद पवार राष्ट्रवादी पुरस्कृत जयंत पाटील यांना 12, तर ठाकरे शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना 24 मते मिळाली. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागली.

गोरखे हे फडणवीस यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्चीत मानला जात होता. भाजपच्या ठरलेल्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांच्या प्रत्येक उमेदवारासाठी 26 मतांची तरतूद करण्यात आली होती. त्यात अजिबात फाटाफूट झाली नाही.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT