Amit Shah-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Devendra Fadnavis Delhi Tour : महायुतीत काय घडतंय; फडणवीसांनी केली मध्यरात्री दिल्लीवारी, अमित शाहांसोबत दीड तास खलबतं

Assembly Election 2024 : दिल्लीवारीत फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. या दिल्लीवारीत त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही होते, असे सांगण्यात येत आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 20 August : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १९ ऑगस्ट) मध्यरात्री दिल्लीवारी केल्याची चर्चा आहे. या दिल्लीवारीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. या दिल्लीवारीत त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही होते, असे सांगण्यात येत आहे.

जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीत सध्या धुसफूस सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी मध्यरात्री दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. नवाब मलिक यांच्या मुलीला अजित पवार यांनी कालच पक्षाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली आहे. स्वतः नवाब मलिक हेही अजित पवार यांच्यासोबत आहेत, अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

नवाब मलिक यांच्याबाबत भाजपचे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय हे सर्वश्रुत असताना अजित पवार यांनी त्यांच्या मुलीला दिलेली प्रवक्ते पदाची जबाबदारी यावर भाजपची काय प्रतिक्रिया असणार हेही पाहावे लागणार आहे. याही मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक महायुतीसोबत नकोत, असे पत्र अजित पवार यांना लिहिले होते, त्यानंतर आम्ही राष्ट्रभक्त असून नवाब मलिकांचे सोबत असणे योग्य नाही, असे त्यांनी अजितदादांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, त्यामुळे फडणवीसांनी मालिक यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे सांगावे असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे महायुतीसोबत असणार की नाही, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीत असल्याचे सांगितलं जात असलं तरी आगामी निवडणुकीत काही वेगळ्या घडामोडी घडतात का हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह यांच्यासोबत समम्र चर्चा झाल्याची माहिती आहे. दीड तासाच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे पहाटे पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT