Dhananjay Mahadik-Ramdas Athavale Sarkarnama
विशेष

'मुन्ना महाडिक ताकदवान उमेदवार; नक्की जिंकतील'

संभाजी राजे यांना शिवसेनेनेच धोका दिला आहे, भाजपने नाही.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : राज्यसभेच्या (Rajya sabha) सहाव्या जागेसाठी शिवसेनेने (shivsena) अगोदर उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे भाजपकडे (BJP) आमदार जास्त असल्यामुळे त्यांनीही तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. मुन्ना (धनंजय) महाडिक (Dhananjay Mahadik) हे ताकदवान उमेदवार आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजप जिंकणार, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. (Dhananjay Mahadik strong candidate; He Will definitely win: Ramdas Athavale)

केंद्रीय मंत्री आठवले हे आज (ता. ३१ मे) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करायची होती, तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार द्यायला नको होता. संभाजीराजे यांनी भाजपसोबत राहायला हवे होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालेली नसेल, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजपकडून उमेदवारी हवी अशी संभाजी राजे यांची भूमिकाच नव्हती. अपक्ष उभे राहणार, असेच ते कायम म्हणत होते.

शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजे यांना शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेनेच धोका दिला आहे, भाजपने नाही. शिवाय भाजपने मुन्ना महाडिक हे ताकदवान उमेदवार दिले आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजप जिंकणार, असा विश्वास आठवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आठवलेंना डुलकी

सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना आठवले यांना झोप अनावर झाली आणि भर कार्यक्रमात आठवले यांना डुलकी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT