Dr. Sudhir Tambe
Dr. Sudhir Tambe Sarkarnama
विशेष

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून (Congress) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) हे उमेदवार असतील, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (ता. ७ ऑक्टोबर) जाहीरपण सांगितले. डॉ. तांबे हे गेली तीन टर्मपासून या मतदासंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांचे ते मेहुणे आहेत. (Dr. Sudhir Tambe's name announced by Congress for Nashik Graduate Constituency)

नाना पटोले म्हणाले की, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या आहेत. नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघ, तर अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. नाशिक पदवीधरमध्ये आमदार डॉ. सुधीर तांबे हे आमचे उमेदवार आहेत. इतर उमेदवार निश्चित झालेले नाहीत.

शिक्षक आणि पदवीधरचे चारही मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. महाविकास आघाडीमध्ये जे निर्णय घेतले, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय, असेही नाना पटोले यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. माजी मंत्री थोरात आणि आमदार तांबे यांचा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या पाच जिल्ह्यांत मोठा संपर्क आहे. तसेच, महाविकास आघाडीचा फायदाही तांबे यांना होऊ शकतो.

या मतदारसंघासाठी भाजपचे नेते तथा विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांचे नाव चर्चेत आहे. राजेंद्र विखे पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये तब्बल २० वर्षे काम केले आहे. ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन, विद्वावता, आणि सल्लगार परिषदेचे सदस्यही होते. लोणीतील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठचे ते कुलपती आहेत. भाजपकडून विखेंना उमेदवारी मिळाल्यास नगरमधील विखे-थोरात यांच्यातच खऱ्या अर्थाने सामना रंगू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT