मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्षाध्यक्ष पदावर दावा; निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख

शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीतील १८० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र आज निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. मात्र, शिवसैनिकांची आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आणखी वेळ मिळावा, अशी मागणी करणार आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज (ता. ७ ऑक्टोबर) धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत होणारी सुनावणी टळली आहे. मात्र, एक मोठी बातमी पुढे आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपलीच शिवसेना (shivsena) खरी असल्याचे सांगून पक्षप्रमुख पदावर दावा केल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. (Eknath Shinde's claim for Shiv Sena party president post; Mentioned in Election Commission's affidavit)

विधानसभेचे ५५ पैकी तब्बल ४० आमदार आणि लोकसभेतील १२ खासदार, तसेच पक्षसंघटनेतील बहुतांश पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचे सांगून एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाा मिळावे, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, शिंदे गटाने केलेला अर्ज विहित नमुन्यात नसल्याचे सांगून शिंदे गटाला पुन्हा अर्ज करण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
‘त्या’ भेटीनंतरच भाजप आमदार विजयकुमार देशमुख पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले...

शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. मात्र, शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रांच्या प्रती शिवसेनेकडून मागण्यात आल्या आहेत. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. कागदपत्रं जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत उत्तर कसं देणार, असा सवाल ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
थोरातांना राष्ट्रवादीने तिकिट दिले की पराभूत करता अन्‌ अपक्ष निवडून देताय : पवार दौंडमधील पराभव विसरेनात

दरम्यान, शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीतील १८० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र आज निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. मात्र, शिवसैनिकांची आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आणखी वेळ मिळावा, अशी मागणी करणार आहे. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे सध्या तयार आहेत. ती दिल्लीत पोहोच झाली आहेत. मात्र, मुंबईतून आणखी ५० हजार प्रतिज्ञापत्रे येत आहेत, त्यामुळे आणखी वेळ मिळावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
अजित पवारांनी बारामती शहर राष्ट्रवादीची सूत्रे दिली तरुण नेत्याच्या हाती!

निवडणूक आयोगाला आजच (ता. ७ ऑक्टोबर) राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांची प्रतिज्ञापत्रे दिली जाणार आहेत. कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार, विभागप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचा समावेश असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com