शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करणार; पण ‘या’ गोष्टींसाठी वेळ वाढवून मागणार

सध्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे तयार असून ती दिल्लीत पोहोच झाली आहेत
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्याकडून निवडणूक आयोगापुढे (Election commission) आज (ता. ७ ऑक्टोबर) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १८० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यासाठी आणखी काही कालावधी वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. (Shiv Sena to file affidavit of national executive members)

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना आपल्या भात्यातील महत्वाचे अस्त्र निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीचे ठराव महत्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार ठाकरे यांच्याकडून कार्यकारिणीतील १८० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र आज दाखल करण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्षाध्यक्ष पदावर दावा; निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख

दरम्यान, सध्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे तयार असून ती दिल्लीत पोहोच झाली आहेत. मात्र, आणखी ५० हजार प्रतिज्ञापत्रे मुंबईतून येत असल्याच्या कारणास्तव शिवसेना आणखी कालावधी मागून घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कार्यकारिणीची प्रतिज्ञापत्रे आजच सादर करण्यात येणार आहेत.

Uddhav Thackeray
‘त्या’ भेटीनंतरच भाजप आमदार विजयकुमार देशमुख पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले...

शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार, विभागप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचा समावेश असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com