Ramesh Bagwe-Rahul Gandhi Sarkarnama
विशेष

Rahul Gandhi's Mumbai Tour : मुंबईच्या ‘त्या’ दौऱ्यात काँग्रेसच्या तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी राहुल गांधींचे जोडे उचलले होते

Congress Minister : संबंधित मंत्र्याने त्या घटनेचे समर्थन केले होते. ‘यामध्ये काहीच गैर नाही,’ अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भाजपविरोधातील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. यानिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधीही मोठ्या कालावधीनंतर मुंबईत येत आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या मागील एका दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे. त्या दौऱ्यात तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राहुल गांधींचे बूट उचलल्याची घटना घडली होती. गांधी यांच्या दौऱ्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (During 'that' visit to Mumbai, then Home Minister of State Congress picked Rahul Gandhi's shoes)

इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीसाठी मंगळवारी (ता. २९ ऑगस्ट) रात्रीच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मुंबईत दाखल झाले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला हेही बुधवारीच मुंबईत पोचले होते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे ही बैठक देशाच्या राजकीय इतिहासात वेगळा अंक लिहित असल्याचे बोलले जात असतानाच दुसरीकडे राहुल गांधींच्या येण्याने भूतकाळातील वेगवेगळ्या घटनांना उजाळाही मिळत आहे. यामध्ये रमेश बागवे यांच्या प्रकरणाची चर्चा प्रकर्षाने होताना दिसत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

केंद्रात आणि राज्यात २०१० मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता. राज्यातील काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये पुण्याचे तत्कालीन आमदार रमेश बागवे यांची गृहराज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. याच दरम्यान राहुल गांधी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. घाटकोपर येथील एका कार्यक्रमादरम्यान रमेश बागवे यांनी राहुल गांधी यांचे बूट उचलले होते. त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना थांबवणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनीही बागवेंना अडविले नव्हते. या घटनेनंतर रमेश बागवे यांच्यासह राहुल गांधींवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘सामना’च्या संपादकीयमधून या घटनेचे वाभाडे काढले होते. माध्यमांमध्ये सर्वत्र टीका होत असताना रमेश बागवे यांनी मात्र या घटनेचे समर्थन केल्याचं पहायला मिळालं होतं, त्यामध्ये काहीच गैर नाही, अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT