Abhijeet Patil Meet BJP Leader : सुप्रिया सुळेंनी राखी बांधलेल्या अभिजीत पाटलांनी घेतली भाजप नेत्याची भेट

Pandharpur politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही त्यांनी शरद पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Abhijeet Patil -Radhakrishna Vikhe Patil
Abhijeet Patil -Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी रक्षाबंधनदिनी राखी बांधली होती. पाटील हे पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. मात्र, त्याच अभिजित पाटील यांनी काल सायंकाळीच भाजप नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Abhijeet Patil, who was tied rakhi by Supriya Sule, meet the BJP leader)

अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही त्यांनी शरद पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाटील‌ हे पंढरपूरचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सुरू असतानाच आज अचानक पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Abhijeet Patil -Radhakrishna Vikhe Patil
INDIA Meeting In Mumbai : सोनिया गांधी, राहुल गांधी शिवतीर्थवर जाणार?

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांना बुधवारी दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी राखी बांधून राजकीय इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी अभिजीत पाटील‌ यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली‌. या वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हेदेखील उपस्थित होते.

Abhijeet Patil -Radhakrishna Vikhe Patil
Rahul Gandhi Mumbai Tour : बाळासाहेबांनी ‘तेव्हा’ राहुल गांधींना कडाडून विरोध केला अन्‌ उद्धव ठाकरेंनी आता मातोश्रीपर्यंत 'रेड कार्पेट' अंथरले!

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली ही भेट राजकीय नव्हती. पंढरपूर मतदार संघात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, यासाठी आणि इतर प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली, असे अभिजीत पाटील‌ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com