Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

Shivsena News : शिवसेना पक्षफुटीनंतरची पहिलीच विधानसभा, किती मतदारसंघात होणार शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेत लढत

Shiv Sena Seat Distribution in Maharashtra : शिवसेनेच्या या दोन्ही गटात राज्यातील सुमारे 26 जागांवर लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी सरळ लढत होत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी अटातटीची निवडणूक होणार आहे.

त्यातच आता लोकसभेप्रमाणे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुतांशी जागेवर शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटात राज्यातील सुमारे 26 जागांवर लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली होती. यावेळी दोन गटात उभी फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना पक्ष अन् चिन्ह दिले. त्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत 26 मतदारसंघात थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना यांच्यात लढत होणार आहे.

या लढतीत कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. या पूर्वी लोकसभा निवडणुकीत ही या दोन गटात 13 जागेवर एकमेकांविरोधात उमेदवार उतरवले होते. त्यामध्ये शिंदे सेना सात जागी तर ठाकरे सेना सहा जागी विजयी झाली होती.

येत्या काळात शिवसेना (Shivsena) कोणाची हे आता जनतेच्या न्यायालयात ठरणार आहे. त्यामुळे या 26 मतदार संघामध्ये विजयासाठी दोन्ही शिवसेनेचे उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे.

या मतदारसंघात होणार लढती

कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे केदार दिघे तर शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लढत होणार आहे. त्यासोबतच कुडाळ (मालवण) मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे यांची लढत होणार आहे.

या मतदारसंघात येणार दोन्ही गट आमने-सामने

सावंतवाडी, रत्नागिरी, दापोली, पाटण, सांगोला, परंडा, कर्जत, मालेगाव बाह्य,नांदगाव, वैजापूर, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर सेंट्रल, सिल्लोड, कळमनुरी, रामटेक, मेहकर, पाचोरा, ओवळा-माजिवडा, मागाठणे, कुर्ला, माहीम, महाड, राधानगरी, राजापूर या 26 मतदार संघात दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT