Political News: आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे.
महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महायुतीच्या काही जागावर तिढा असून यावर दिल्ली दरबारी चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीचा मेगाप्लॅन ठरविताना नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने 99 उमेदवारांची घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा केली. मात्र, अजूनही राज्यात काही विधानसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
त्या मतदारसंघावर महायुतीमधील एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केला आहे. या मतदारसंघात उमेदवार ठरत नसल्यामुळे आता हा तिढा दिल्लीच्या दरबारात सॊडण्यासाठी बैठक पार पडली.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही, असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
ही बंडखोरी टाळण्याच्या सूचना त्यांनी तीन पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत. उमेदवारी मिळाली नाही अशा इच्छुकांकडून होणारी बंडखोरी टाळण्यावर महायुतीने भर दिला जाणार आहे. त्यासोबतच तीन पक्षातील बंडखोरी टाळण्यावर नेत्यांनी भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी शाह यांनी नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढा, राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा, बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. बंडखोरांवर राज्यातील नेत्यांनी नियंत्रण ठेवावे, अशा सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या.
तीन पक्षाचा असणार एकच जाहीरनामा
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा एकच जाहीरनामा असणार आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळा जाहीरनामा सादर करणार नाहीत. भाजप (Bjp) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित जाहीरनामा पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्र प्रचार करणार नसून एकत्रच प्रचार करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीने एकत्रित प्रचार केल्यास त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.