Mumbai Shivsena News : खासदार गजानन कीर्तिकर आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी सोडून जाणं, हे आमच्यासाठी वेदनादायी होतं. परंतु आज ते बोलत आहेत की, शिंदे गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे. आम्हाला मानसन्मान मिळत नाही. आम्ही काय वेगळं सांगत होतो, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. (Gajanan Kirtikar leaving Shiv Sena was painful for us: Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले की, भाजप हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सापत्न वागणूक देत हेाता. आतापर्यंत जे जे त्यांच्यासोबत गेले, त्यांना भाजपनं खाऊन टाकलं आहे. आता त्यांना कळत असेल की शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती, या मगरीपासून दूर होण्याची.
भाजपने (BJP) त्यांचा मूळ स्वभाव आणि त्यांची मूळ भूमिका सोडलेली नाही. जर गजानन कीर्तिकरांसारखा (Gajanan Kirtikar) आमचा जुना सहकारी तिथे जाऊनसुद्धा सुखी नाही; म्हणजेच भारतीय जनता पक्षांना कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे आणि एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे
फुटलेल्या गटात अस्वस्थता, नाराजी आहे. त्या गटात पुन्हा दोन गट पडलेले आहेत. पण, गजाभाऊ किर्तीकर यांनी सांगितलं आहे, ती शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्या चिडीतून आम्ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलो. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, सत्तेत असताना आपल्या लोकांना निधी दिला नाही. शिवसेना आमदारांची कामे रखडवून ठेवली होती. गजानन किर्तीकर यांच्यासारखा माणूस जर शिंदे गटात जाऊन आम्ही म्हणतोय तेच सांगत असतील, तर आमची भूमिका योग्य आहे, हे सिद्ध होते.
निवडणुकीत दिसेल कोणाची ताकद किती
ताकद कशी काय आजमावणार. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद जास्त असेल असं अजितरावांच्या म्हणण्यावरून वाटत आहे. पण, अजून निवडणुका घोषित व्हायच्या आहेत. एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ, कुठलाही महत्त्वाचा निर्णय हा तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मिळून घ्यायचा असतो आणि कुणाची कुठे किती ताकद आहे, याचं मोजमाप व्हायचं आहे
अजितदादा योग्य बोलत आहेत
काल भाजप म्हणत होती की, मुंबईचा महापौर आमचाच होईल. पण महापौर दिल्लीतून नेमता येत नाही. निवडणुका घ्या मग समजेल नक्की कोणाचा महापौर होईल. निवडणुकीच्या माध्यातून खरी शिवसेना कोणती हे कळेल, त्यामुळे अजितदादा योग्य बोलत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.