Maharashtra Politic's : पाठीत खंजीर खूपसणाऱ्या गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे परत उघडले जाणार नाहीत : शिवसेना नेत्याने ठणकावले

शिंदे गटातील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते आपले दुःख सांगत असतात, आमच्याशी बोलतात.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Shivsena News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी गद्दारी करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, जे फक्त पैशाला विकले गेले आहेत, त्यांच्यासाठी परत पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. ही महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेची आणि असंख्य शिवसैनिकांची इच्छा आहे, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (Shiv Sena's doors will not be opened again for traitors: Sanjay Raut)

शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. ते म्हणाले की, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना जर परत पक्षात घेतले तर आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. कारण, गद्दारांविषयी जनतेत आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त होईल.

Sanjay Raut
Shivsena News : शिवसेना शाखा प्रमुखाचा उल्हासनगरमध्ये चाकूने वार करून खून

शिंदे गटातील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते आपले दुःख सांगत असतात, आमच्याशी बोलतात. खासदार गजानन किर्तीकर यांनी जे दुःख मांडले, तीच सर्वांची भावना आहे. चेहऱ्यावर ते काहीही दाखवत असले तरी सर्वांमध्ये निराशेची आणि दुःखाची भावना आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut
Pune News: अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपात आलेल्या नेत्याच्या नवीन घरी बावनकुळेंची भेट; जुन्या, निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या

दरम्यान, जे लोक पक्षाशी बेईमानी करतात, जे पक्ष सोडून जातात, त्यांच्यासाठी पुन्हा पक्षाचे दरवाजे बंद झाले पाहिजेत. अशा लोकांसाठी देशातील सगळ्याच पक्षाचे दरवाजे बंद असले पाहिजेत, अशी भावनाही राऊतांनी व्यक्त केली.

मला फडणवीसांची दया येते

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीमध्ये आहे. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, ते देखील हेलपाटे मारत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय जबाबदारी आहे, मला माहित नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, आता ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्या चालवत होते, नक्की त्यांच्याकडे काय जबाबदारी दिली आहे ते पहावं लागेल. पण, मला त्यांची दया येते त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे, त्याबाबत मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

Sanjay Raut
Paranda Bazar Samiti : सावंतांच्या मतदारसंघातील बाजार समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; संचालकांच्या अपहरणामुळे निवडणूक राज्यात गाजली

अर्बन नक्षलवाद हे तुमचे अपयश

अर्बन नक्षलवादाला जबाबदार कोण आहे, गृहमंत्री कोण आहेत, तेच मुख्यमंत्री असताना जी दंगल उसळली या महाराष्ट्रात, तेव्हासुद्धा हाच आरोप केला होता. अजून तुम्ही मोडून काढू शकला नसाल तर ते तुमचे अपयश आहे, तुमच्या व्यवस्थेविरोधात हे बंड आहे. पण, नक्षलवादाच्या खोट्या प्रकरणात लोकांना अडकवून त्यांना नक्षलवादी, दहशतवादी ठरवून राज्य करत आहात, त्यांच्याविरुद्ध हा उठाव आहे, असा इशाराही राऊतंनी सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com