George Fernandes Sarkarnama
विशेष

George the Giant Killer : ....अन् तेव्हापासून जॉर्ज फर्नांडिस यांना 'जॉर्ज द जायंट किलर' म्हणणं सुरू झालं

George Fernandes Death Anniversary : जाणून घ्या, जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील एक खास प्रसंग

Mayur Ratnaparkhe

George Fernandes Politics : कामगार चळवळीचे दिवंगत ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नाडीस यांची आज(मंगळवार) पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्या संघर्षमय आयुष्य आणि राजकीय वाटचालीबाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. जॉर्ज फर्नाडीस यांचे वडील त्यांना वकील बनवू इच्छित होते. परंतु ते पादरी बनण्यासाठी निघाले, मात्र लवकरच मोहभंग झाला. कामगार संघटनांचे नेतृत्व केलं. एक काळ असा होता की ते हवं तेव्हा मुंबई थांवबू शकत होते. राजकारणात लोहियांशी जुडले आणि काँग्रेसविरोधातील भूमिका स्वीकारली आणि ती आयुष्यभर कायम राहिली.

यामध्ये 1974 रेल्वे संप असो किंवा 1975ची आणीबाणी. ते इंदिरा गांधींच्या डोळ्यात खूपत होते. शेवटच्या कालखंडात एनडीएच्या माध्यमातून ते भाजपशी(BJP) जुडले गेल्याने ते अनेक स्वकीयांच्या निशाण्यावर आले होते. 1949मध्ये जॉर्ज मुंबई पोहचले. भाजी-भाकरी आणि राहण्यास जागा मिळवण्याचे आवाहन होते. अशावेळी त्यांनी अनेकरात्री फुटपाथवर घालवल्या. सुरुवातीच्या काळात एका दैनिकात प्रुफरिडींगचं कामही केलं.

त्यानंतर ते 1950मध्ये डॉक्टर राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. त्यांना स्वत:पेक्षा जास्त दुसऱ्यांच्या गरजा पाहून अस्वस्थ वाटू लागले. दुकानं, हॉटेल्स आदी ठिकाणी छोट्यामोठ्या नोकऱ्या करणाऱ्यांशी त्यांचा संबंध येऊ लागला. यानंतर तो संपर्क टॅक्सी, ऑटो चालकांपासून ते कारखान्यातील कामगारांपर्यंत वाढत गेला. या कामगार वर्गांच्या हक्कासाठी लढताना आणि त्यांना संघटित करता करता जॉर्ज मुंबईती एक चर्चित नाव बनलं आणि ते एक परिचित चेहरा बनले. त्यांच्या एका आवाजावर मुंबई थांबायची. कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्यांना आणि हुकूमशाही गाजवणाऱ्यांना जॉर्ज यांनी वठणीवर आणणं सुरू केलं. 1961 मध्ये जॉर्ज मुंबई महापालिकेचे(BMC) सदस्य म्हणून निवडून आले.

1967 हे वर्ष जॉर्ज यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात खास ठरलं. संयुक्त सोशालिस्ट पार्टीने जॉर्ज यांना लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे(Congress) दिग्गज नेते एस.के. पाटील होते आणि ते मुंबईचे बेताज बादशाह मानले जात होते. एका पत्रकारपरिषदेत त्यांना विचारण्यात आले की, तुमच्याविरोधात नगरसेवक जॉर्ज फर्नाडिस हे निवडणूक लढवत आहेत?

तेव्हा पाटील म्हणाले होते की, कोण फर्नाडिस? मी नाही ओळखत. त्यावर पत्रकारांनी त्यांना उचकवले आणि म्हटले की, तसं तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, पण तरीही तुम्ही पराभूत झालाच तर? यावर पाटील यांनी अहंकारी स्वरात उत्तर दिले की, देव सुद्धा मला हरवू शकत नाही. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये मथळे झळकले की, पाटील म्हणाले, देवही मला हरवू शकत नाही.

यानंतर त्याच्या पुढच्याच दिवशी मुंबईतील मतदारांना आठवण करून देताना फर्नाडिस यांचे पोस्टर झळकले होते की, पाटील म्हणतात त्यांना देवही हरवू शकत नाही. परंतु तुम्ही त्यांना हरवू शकतात. यानंतर मग पाटील ही निवडणूक जवळपास 42 हजार मतांनी हरले होते. मग काय तिथून पुढे ज्याच्या त्याच्या तोंडात केवळ जॉर्ज यांचंच नाव होतं. जॉर्ज द जायंट किलर असं त्यांना संबोधलं जावू लागलं. पुढे नंतर, पत्रकार के. विक्रम राव यांना आणीबाणीच्या प्रसिद्ध डायनामाइट प्रकरणात जॉर्जसह आरोपी बनवण्यात आले. दोघांनाही तिहार तुरुंगात एकत्र ठेवण्यात आले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT