India Budget Tradition : अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस अन् वेळेबाबत इंग्रजांपासूनची परंपरा सर्वप्रथम 'या' अर्थमंत्र्यानी मोडली!

India Union Budget : जाणून घ्या, नेमका कोणी कधी केला बदल आणि काय होती पूर्वापार चालत आलेली अर्थसंकल्पाबाबतची ती परंपरा?
India Union Budget
India Union BudgetSarkarnama
Published on
Updated on

Union Budget News : देशाचा 2025चा सर्वसाधरण अर्थसंकल्प सादर होण्यास आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशासमोर मोदी सरकारचा 14 अर्थसंकल्प सादर करतील. परंतु तुम्हाला माहीत आहे की, की 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याचे सर्वात आधी कधी निश्चित झाले होते. की आधीपासूनच असंच होत आलं आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

स्वातंत्र्यानंतर फेब्रुवारीमध्ये कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सांयकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता. ही वेळ भारत आणि यूनायटेड किंगडम यांच्या वेळेतील अंतरामुळे निवडली गेली होती. भारताचा वेळ ब्रिटीश उन्हाळी वेळेपेक्षा 5.5तास पुढे आहे. सायंकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केल्याने हे निश्चित झाले की, ब्रिटनमध्ये दिवसाच अर्थसंकल्प जाहीर केला गेला.

India Union Budget
Republic Day Chief Guest : भारताचे प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे कसे ठरतात, तुम्हाला माहीत आहे का?

मात्र 1999मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलली. 1998 ते 2020 दरम्यान भारताच्या अर्थमंत्र्यांनी सूचवले की, अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला गेला पाहिजे, जेणेकरून आकडेवारीचे सखोल विश्लेषण करण्यास पुरेसा वेळ मिळू शकेल.

आतापर्यंत जवळपास 20 वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जात होता. परंतु 2017मध्ये यात बदल केला गेला. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली(Arun Jaitley) यांनी घोषणा केली की, 2017पासून अर्थसंकल्प 1फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.

India Union Budget
Enemy Property and Saif Ali Khan : भारत सरकारने घोषित केलेली 'शत्रू संपत्ती' नेमकी कोणती अन् सैफचा काय आहे संबंध?

जेटलींनी ही देखील घोषणा केली की, जर अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात आहे, तर केंद्राला 1 एप्रिलापासून सुरू होणाऱ्या वर्षासाठी नवीन धोरणं आखण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. हेच कारण आहे की अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीपासून मांडला जाऊ लागला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com