Vijayshinh Mohite Patil-Girish Mahajan Sarkarnama
विशेष

Girish Mahajan On Akluj Tour : फडणवीसांचा निरोप घेऊन संकटमोचक महाजन मोहिते पाटलांच्या भेटीला

Mohite Patil Meeting : अकलूजमधील बैठकीत काय निर्णय झाला, याचा तपशील मिळाला नसला तरी येत्या दहा दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता खुद्द शेकापचे जयंत पाटील यांनी वर्तविली आहे. त्यामुळे ‘डॅमोज कंट्रोल’साठी गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांना भेटायला अकलूजमध्ये येत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघावरून अकलूजमधील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान घडामोडी घडत आहेत. मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन मोहिते पाटील यांच्या भेटीला अकलूजमध्ये येत आहेत.

माढा लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाऊ शकतात. माढ्याच्या रणांगणांत उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकलूजमधील बैठकीत काय निर्णय झाला, याचा तपशील मिळाला नसला तरी येत्या दहा दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता खुद्द शेकापचे जयंत पाटील यांनी वर्तविली आहे. त्यामुळे ‘डॅमोज कंट्रोल’साठी गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांना भेटायला अकलूजमध्ये येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील (Mohite Patil) यांनी बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्याचे शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते.

मोहिते पाटील यांच्या हालचालीवर भाजपचे बारीक लक्ष असून या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे पक्षाचेही लक्ष होते. आता मोहिते पाटील खरोखरच माढा लोकसभेच्या मैदानात उतरणार की बैठकांचा नुसताच फार्स करणार, हे पाहावे लागणार आहे. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव लक्षात घेऊन मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोहिते पाटील यांच्या वाढत्या राजकीय हालचाली पाहता भाजपकडूनही वेगाने सूत्रे हलविण्यात येत आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोहिते पाटील यांच्या हालचालींवर लक्ष आहे. त्यामुळे फडणवीसांचा निरोप घेऊन थोड्या वेळातच भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) हे शिवरत्न बंगल्यावर दाखल होणार आहेत. फडणवीसांचा कोणता निरोप घेऊन ते मोहिते पाटील यांच्याकडे आले आहेत. ते मोहिते पाटील यांची कशी समजूत काढतात, याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे. तसेच, मोहिते पाटील हे महाजन यांचे ऐकणार का, याकडेही माढ्याचे डोळे लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT