Mahadev Jankar, Gopichand Padalkar Sarkarnama
विशेष

Chaundi Politics : चौंडीतील जयंतीसोहळ्यातून गुरुला जमलं नाही ते शिष्यानं करून दाखवलं !

Mahadev Jankar News : जानकरांचे लक्ष दिल्लीवर, चौंडीतून पडळकर करणार राजकारण?

सरकारनामा ब्यूरो

Gopichand Padalkar and Chaundi : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली जाते. या जयंती सोहळ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी धनगर समजाची आस्मिता जागविण्याचे काम केले. दरम्यान, जानकर यांनी हा अहिल्यादेवींचा जयंती सोहळा मुंबई येथे साजरा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर यंदा प्रथमच जानकरांनी हा सोहळा राजधानी दिल्ली येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. या काळात जानकरांचे शिष्य भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी चौंडी येथील सोहळ्यावर वर्चस्व निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) भाजप नेते दिवगंत गोपीनाथ मुंडे यांना गुरूस्थानी मानतात. मुंडे दरवर्षी बीड जिल्ह्यातील भगवान गडावर सोहळ्याचे आयोजन करीत होते. त्यास राज्यभरातून लोक येत होते. त्याच धर्तीवर जानकर यांनी चौंडी येथे आहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करण्यास सुरूवात केली. या जयंतीच्या माध्यमातून ते सुमारे २०-२२ वर्षांपासून धनगर समाजाची आस्मिता जागविण्याचे कार्य करीत आहेत.

दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर जानकरांनी चौंडी (Chandi) येथील सोहळ्यावरून लक्ष कमी करून मुंबई येथील कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केले. यासह मी फक्त धनगर समाजाचा नेता नाही, सर्व समाजांचा नेता असल्याचे वारंवार सांगितले. त्यातूनच चौंडीऐवजी जानकरांनी अहिल्यादेवी होळकरांचे विचारांचा जागर मुंबईत (Mumbai) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मुंबईत जयंती सोहळ्याचे आयोजन करत आहेत.

जानकरांच्या या भूमिकेमुळे मूळ चौंडीभोवती फिरणाऱ्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. ती पोकळी जानकरांचे शिष्य असलेले भाजप नेते गोपीचंद पळकर (Gopichand Padalkar) यांनी भरून काढली. पडळकर हे एके काळी रासपचे सांगली जिल्हाध्यक्ष होते. जानकर मुंबईत रमले असताना पडळकरांनी चौंडी येथील कार्यक्रमाचे आयोजन करीत होते. आता या सोहळ्यावर पूर्णपणे पडळकारांचेच वर्चस्व असल्याचे बुधवारी (ता. ३१ मे) दिसून आले. या कार्यक्रमातून अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतराची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली आहे.

मुंबईनंतर जानकरांचे लक्ष 'दिल्ली'वर आहे. त्यानुसार त्यांनी रासपचे दिल्लीत कार्यालय सुरू करणार आहेत. त्यानुसार यंदा प्रथमच त्यांनी दिल्ली (Delhi) येथे आहिल्यादेवींच्या जंयती सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यावर त्यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचा जागर देशाच्या राजधानीत करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "राष्ट्रीय समाज पक्षाच्या (RSP) वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर (Rajmata Ahilya Devi Holkar) यांची २९८ वी जयंती यंदा नवी दिल्ली येथे साजरी करण्याचा निर्णय घेतला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा खरा परिचय देश पातळीवर करून देण्याच्या उद्देशाने या कार्यकर्माचे आयोजन केले आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT