Manoj Jarange Patil  Sarkarnama
विशेष

Manoj Jarange Patil : 'सरकारनं माझं फेसबुक अकाउंट बंद केलंय'; जरांगे पाटलांचा कडक इशारा

Antarvali Sarati Sabha : फेसबुक आणि नेट बंद करून मराठ्यांना काय होणार आहे. मराठ्यांजवळ काय नाही, ते तुमच्या पुढचे आहेत

Vijaykumar Dudhale

Jalna News : मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची आज (ता. १४ ऑक्टोबर) अंतरवाली सराटी येथे विराट सभा झाली. त्या सभेच्या दोन तास अगोदर जरांगे पाटील यांचे फेसबुक अकाउंट बंद करण्यात आले होते. जरांगे पाटील यांनी भाषणातून याबाबतची माहिती देत सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. (Government has closed my Facebook account: Manoj Jarange Patil)

मराठा समाजाला उचकटण्यासाठी सरकारने दोन तासांपूर्वी माझं फेसबुक अकाउंट बंद केले आहे. अरे भाऊ माझं फेसबुक अकाउंट बंद झालं आहे, पण अंतरवाली सराटीत जमलेला समुदाय बघ ना. तो काय करेल. फेसबुक आणि नेट बंद करून मराठ्यांना काय होणार आहे. मराठ्यांजवळ काय नाही, ते तुमच्या पुढचे आहेत, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

मीडियावाल्यांचेही नेट बंद करण्यात आले आहे, पण त्यांनी लाइव्ह टेलिकास्ट व्हॅन आणून मराठ्यांची विशाल सभा अवघ्या देशाला दाखवली आहे. काय सरकार आमच्याबरोबर डोकं लावतं. तुमचं डोकं जेथून बंद पडतं, तेथून मराठ्यांचं डोकं चालू होतं, असेही त्यांनी सांगितले.

घोषणा देणाऱ्यांना समज

मनोज जरांगे यांच्या भाषणाच्या वेळी एका ठिकाणाहून कायम आवाज येत होता. घोषणा दिल्या जात होत्या. त्याचा जरांगे यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. तुम्ही मगापासून उगीचच घोषणा देत आहात. मला जरा शंका यायला लागली आहे. तुम्ही जरा शांत बसा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी भाषणातून केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT