Adv. Gunaratna Sadavarte
Adv. Gunaratna Sadavarte Sarkarnama
विशेष

'माझी हत्या होऊ शकते' : पोलिसांनी ताब्यात घेताच सदावर्तेंचा वळसे-पाटलांवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदावर्ते यांनी मोठा आरोप केला आहे. ‘माझी हत्या होऊ शकते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याविरोधात माझ्या पतीने तक्रार दिलेली आहे, असा खळबळजनक आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. (Gunaratna Sadavarte's serious allegations against Home Minister Dilip Walse Patil)

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ हल्ल्यामागे ॲड. सदावर्ते हे असल्याचे मुंबई पोलिसांना संशय आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक सदावर्ते यांच्या घरी आज रात्री पोचले. पोलिसांनी सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांनी थेट वळसे पाटलांवरच हल्लाबोल केला आहे. माझी हत्या होऊ शकते, गृहमंत्री वळसे पाटील यांच्याविरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिलेली आहे. मला कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेण्यात आलेले आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता मला घरातून उचलून नेण्यात येत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, पोलिस घरी आल्यानंतर त्यांना ‘मला नोटीस न देता चौकशीला कसे आला आहात,’ अशी विचारणा केली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना चौकशीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पोलिसांना चौकशीला सहकार्य करण्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदावर्ते यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न असं निष्पन्न झालं आहे की, शरद पवार यांच्या घरावर ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे. त्या कर्मचाऱ्यांची कोणीतरी दिशाभूल केली आहे. त्यांना त्या ठिकाणी जाण्यास कुणीतरी सांगितले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ॲड. सदावर्ते यांची नाव आहे. कारण, त्यांच्या भाषणांचा पोलिसांकडून अभ्यास करण्यात आला आहे. ते आपल्या भाषणात एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत आहे, असे अनेकदा सांगितले होते. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT