Silver Oak Attack : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले

सुमारे चार ते पाच पोलिस अधिकारी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते.
Adv. Gunaratna Sadavarte
Adv. Gunaratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे. सुमारे चार ते पाच पोलिस अधिकारी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. (Mumbai Police Adv. Gunaratna Sadavarte was taken into custody for questioning)

पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न असं निष्पन्न झालं आहे की, शरद पवार यांच्या घरावर ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे. त्या कर्मचाऱ्यांची कोणीतरी दिशाभूल केली आहे. त्यांना त्या ठिकाणी जाण्यास कुणीतरी सांगितले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ॲड. सदावर्ते यांची नाव आहे. कारण, त्यांच्या भाषणांचा पोलिसांकडून अभ्यास करण्यात आला आहे. ते आपल्या भाषणात एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत आहे, असे अनेकदा सांगितले होते. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Adv. Gunaratna Sadavarte
Silver Oak Attack : देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यिारींच्या भेटीला; तर्कवितर्कांना उधाण

दरम्यान, पोलिस घरी आल्यानंतर त्यांना ‘मला नोटीस न देता चौकशीला कसे आला आहात,’ अशी विचारणा केली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना चौकशीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पोलिसांना चौकशीला सहकार्य करण्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदावर्ते यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Adv. Gunaratna Sadavarte
Silver Oak Attack : न्यायालयाचा निर्णयानंतर पेढे वाटणाऱ्यांनी आज पवारांच्या घरावर दगडफेक का केली?

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज (ता. ८ एप्रिल) दुपारी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाला आहे. त्यानंतर त्याचा विविध स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजितबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्य प्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.

हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी : जयंत पाटील

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या घरावर आज (ता. ८ एप्रिल) काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. उच्च न्यायालयाचा निर्णय गुरुवारी (ता. ७ एप्रिल) आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते, जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com