मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी (Bhagat Singh Koshiyari) यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांची ही भेट नियोजित नाही, त्यामुळे तर्क वितर्कांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. (Devendra Fadnavis meet on Governor Bhagat Singh Koshiyari)
एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज (ता. ८ एप्रिल) दुपारी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाला आहे. त्यानंतर त्याचा विविध स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. एकीकडे असे चित्र असताना भाजप नेत्यांकडून वेगळी भाषा बोलली जात आहे. त्यात माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी तर चक्क राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस हे राज्यापाल कोश्यिारी यांच्या भेटीला जाताना त्यांच्यासोबत दुसरे कोणीही नव्हते. ते एकटेच कोश्यिारी यांच्या भेटीला गेले आहेत. मात्र, ते कोणत्या कारणासाठी राज्यापालांना भेटत आहेत, हे मात्र समजू शकलेले नाही.
नेत्यांच्या घरावरील आंदोलन समर्थनीय नाही
दरम्यान, पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजितबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्य प्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.
हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी : जयंत पाटील
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या घरावर आज (ता. ८ एप्रिल) काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. उच्च न्यायालयाचा निर्णय गुरुवारी (ता. ७ एप्रिल) आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते, जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.