Chitra Wagh Sarkarnama
विशेष

Chitra Wagh News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा लागला, याचे दुःख आहेच : चित्रा वाघांनी दिली कबुली

मी पक्षाची संस्थापक सदस्य होते, पक्षाशी इमोशनल अटॅचमेंट होती. पण....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडल्याचे दुःख आहेच. मी पक्षाची संस्थापक सदस्य होते, पक्षाशी इमोशनल अटॅचमेंट होती. पण, आपण पक्ष सोडावा, अशी कधी कधी परिस्थिती निर्माण केली जाते, निर्माण होते, त्यातून मला राष्ट्रवादी पक्ष सोडावा लागला. त्यामुळे पक्ष सोडल्याचे दुःख आहेच, अशी कबुली भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली. (It is sad to have to leave the NCP : Chitra Wagh)

चित्रा वाघ यांनी विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्याच्या प्रमुख आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी तब्बल चार वर्षांनंतर राष्ट्रवादी सोडल्याचे दुःख असल्याचे स्पष्ट केले.

वाघ म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर माझी इमोशनल अटॅचमेंट होती. पण कधी कधी परिस्थिती निर्माण होते, कधी केली जाते. त्यामुळे आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात. ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, त्या ठिकाणी आम्ही आम्ही आमचं घर समजून काम करत असतो. आमच्या आयुष्यातील उभारीची वर्षे असतात, जी आमचं करिअर अथवा परिवार असो त्यांच्यासाठी महत्वाचा असतो.

आज जर आम्ही दुसऱ्या क्षेत्रात असतो तर दुसरं काहीतरी वेगळे झालो असतो. त्यामुळे एका पक्षात २०-२० वर्षे देत असताना एक घर आणि परिवार म्हणूनच काम करत असतो. पण, अशी परिस्थिती निर्माण केली जाते. त्यामुळे आपल्याला पुढे जायचे असते, त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

मंत्रीपद मिळावं, अशी माझीही इच्छा; पण...

तुमची जशी मी मंत्री व्हावी, अशी इच्छा आहे, तशी माझीही इच्छा आहे. पण एक नाही तर चार-पाच महिला मंत्री असाव्यात, असे मला वाटते. चांगल्या महिला आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळावी. पण आपल्या मर्यादा आपल्याला माहिती असायला हव्यात. मी आधीही एका पक्षात वीस वर्षे होते. त्या ठिकाणीही काम केले आहे. आमदार, खासदार आणि मंत्री झाले म्हणूनच मी काम करणार आणि मगच माझी काम होणार या मताशी मी सहमत नाही. पण आमचं एकही काम थांबलेलं नाही, असेही चित्रा वाघ यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT