Shinde Group News : मालेगावमधील सभेआधीच शिंदे गटाचा ठाकरेंना दणका : नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी व्हावी, यासाठी त्यांचे निष्ठावंत कामाला लागलेले असताना दुसरीकडे शिंदे गट विशेषतः मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेला सुरूंग लावण्याचे काम केले आहे
Thackeray group's Leader join Shivsena
Thackeray group's Leader join ShivsenaSarkarnama

ठाणे : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांची आज सायंकाळी नाशिकमधील (Nashik) मालेगावमध्ये सभा होत आहे. या सभेआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा दणका दिला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हासंघटक, नगरसेवक, सोळा सरपंच, सभापती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Thackeray group's key officials in Nashik join Shiv Sena)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी मालेगावमध्ये सभा होत आहे. मालेगावचे आमदार तथा मंत्री दादा भुसे यांनी बंडखोरी करत शिंदे गटाची वाट धरली आहे. भुसे यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने मालेगावमध्ये अद्वैत हिरे यांना पक्षात प्रवेश देत त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. त्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह विविध नेते कामाला लागले आहेत.

Thackeray group's Leader join Shivsena
Konkan News : श्रीवर्धनमध्ये ७० टक्के कुणबी असूनही तटकरेंना ४० हजारांचा लीड कसा मिळतो? : कुणबी शिवसेवाचा सवाल

एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी व्हावी, यासाठी त्यांचे निष्ठावंत कामाला लागलेले असताना दुसरीकडे शिंदे गट विशेषतः मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेला सुरूंग लावण्याचे काम केले आहे. शिवसेनेच्या महत्वाचा पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडून गळाला लावण्यात आलेले आहे. त्यामुळे सभेआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा दणका दिल्याचे मानले जात आहे.

Thackeray group's Leader join Shivsena
Raju Shetti News : मला रघुनाथदादा पाटलांचा सत्कार करायचाय : राजू शेट्टींनी व्यक्त केली इच्छा !

शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक, नगरसेवक, सभापती, सोळा सरपंच आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेत म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या स्वागतासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे नेते या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com