Mumabi News : अर्थमंत्रालय ताब्यात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना खूश करून टाकले. त्यातही बंड साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँगग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटालाही त्यांनी भरघोस निधीचे वाटप केले आहे. अजित पवार यांच्या निधीवाटपाच्या या कौशल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भारी कौतुक वाटत आहे. तसे त्यांनी बोलूनही दाखविले आहे. (Jayant Patil praised Ajit Pawar's fund allocation skills)
पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यावर आमदार जयंत पाटील (Jayant Patil) हे बोलत होते. ते म्हणाले की, मी काही वर्षे राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. मला कौतुक आहे की, पुरवण्या मागण्याही आता ४६ हजार कोटींपर्यंत गेल्या. मागच्या वेळी अर्थसंकल्प झाल्यानंतर आता पुरवण्या मागण्याही मांडण्यात आलेल्या आहेत.
राज्य सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करू शकतं. मागेल त्याला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळतोय, याचं मलाही कौतुक आहे. लोकप्रतिधिनींना त्यांच्या मतदारसंघासाठी निधी मिळाला, तर त्यांच्यामध्ये थोडीशी खूशी राहणारच ना, असेही जयंत पाटील यांनी स्पष्टपणे कबूल केले.
दरम्यान, अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच, भाजपच्याही काही आमदारांमध्ये नाराजी होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निर्देश देताच खातेवाटप जाहीर झाले होते. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार नाराज होणार नाहीत, याची पुरेपूर खबरदारी अजित पवार यांनी निधी वाटपच्या वेळी घेतलेली दिसत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधीच्या वाटपावरून झालेल्या आरोपाप्रमाणे या वेळी होणार नाही, याचीही दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही अजित पवार यांनी निधीचे वाटप केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश आहे.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेवरही जयंत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अंदाज व्यक्त करणं योग्य नाही. कारण, अजितदादा मुख्यमंत्री कसे होऊ शकतात, हे कळल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.