Sharad Pawar-Jayant Patil-Dilip Walse Patil-Narendra Modi Sarkarnama
विशेष

Jayant Patil Taunts Walse Patil : जयंत पाटलांचा वळसेंना जोरदार टोला; ‘जिस स्कूलमें आप अभी अभी दाखिल हुए है, उस स्कूल के प्रिन्सिपलभी...’

Vijaykumar Dudhale

Jalgaon News : आमच्यातून बाहेर गेलेली लोकं आता शरद पवार यांच्या कर्तृत्वावर सवाल करायला लागले आहेत. पण, त्यांना एवढंच सांगतो की, ‘जिस स्कूलमें आप अभी अभी दाखिल हुए है! उस स्कूल के प्रिन्सिपलभी पवारसाहब के पास ट्यूशन लेते है!’अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लगावला. (Jayant Patil taunts Dilip Walse Patil)

जळगाव येथील स्वाभिमान सभेत जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वळसे पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आमदार जयंत पाटील म्हणाले की, ज्यावेळी शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा स्वतःच्या जिवावर आणि कर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर एकूण चार वेळा ते मुख्यमंत्री झाले आहेत. पवार साहेबांच्या सोबत होता, तेव्हा तुम्हाला या गोष्टी सूचल्या नाहीत. कुठल्या शाळेत जायचं, याचा तरी अभ्यास करायचा होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आम्ही तिघांनी लाठीहल्ल्याचा आदेश दिल्याचे सिद्ध झाल्यास आम्ही राजकारण सोडू,’ असे आव्हान दिले होते. त्याचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘तुमचं सरकार आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्हाला न विचारता पोलिस लाठीचार्ज करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता लाठीचार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करताय, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

काय म्हणाले होते वळसे पाटील?

शरद पवार यांच्या उंचीइतका नेता देशात नाही, असे आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही, असे विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT