Sharad Pawar Challenge To Modi : आरोप खोटे निघाले तर पंतप्रधान मोदी काय शिक्षा घेणार?; शरद पवारांचे चॅलेंज

सध्याचे सरकार सत्तेचा वापर ईडी व सीबीआयच्या कारवाया विरोधकावर करण्यासाठी वापरत आहेत.
Narendra Modi-Sharad Pawar
Narendra Modi-Sharad Pawar Sarkarnama

Jalgaon News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खरंच चुकीचे काम केले असेल तर त्याची सखोल चौकशी करा; परंतु जर खोटं निघालं तर पंतप्रधान मोदी काय शिक्षा घेणार, हेही त्यांनी सांगावं. पंतप्रधानांनी खोटे आरोप करावेत, हे जनतेच्या हिताचे नाही, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. (If the allegations turn out to be false, what punishment will PM Modi take? : Sharad Pawar)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जळगाव येथे आज (ता. ५ सप्टेंबर) स्वाभिमान सभा झाली. त्या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिले. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, संतोष चौधरी आदी उपस्थित होते.

Narendra Modi-Sharad Pawar
Eknath Khadse Lok Sabha Candidate : एकनाथ खडसे जळगावमधून राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार ; जयंत पाटील यांचे स्पष्ट संकेत

केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला. ते म्हणाले की, सत्तेचा उपयोग जनतेसाठी करायचा असतो. परंतु सध्याचे सरकार सत्तेचा वापर ईडी व सीबीआयच्या कारवाया विरोधकावर करण्यासाठी वापरत आहेत. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. सद्यस्थितीत सत्तेचा संपूर्ण गैरवापर सुरू आहे.

Narendra Modi-Sharad Pawar
Jayant Patil Speech : तुम्हाला न विचारताच लाठीजार्च होत असेल तर सरकारमध्ये तुम्ही काय करताय?; जयंत पाटलांचा सवाल

देशातील आणि राज्यातील सरकारला शेतकऱ्यांविषयी कोणतीही आस्था नाही. कांदा, कापूस यांच्या बाजारभावाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, यवतमाळ जिल्ह्यात तब्बल वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी हा भीक मागत नाही, तर आपल्या घामाची किंमत मागतो आहे, मात्र हे सरकार तेवढेही त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे देशातील आणि राज्यातील सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिली आहे, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, असेही पवारांनी नमूद केले.

Narendra Modi-Sharad Pawar
Jalgaon Sabha : सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय दोन महिन्यांत फिरवता अन्‌ मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांचे कारण देता; आव्हाडांचा भाजपला सवाल

जालना जिल्ह्यात शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे मराठा बांधव आणि शेतकरी अशा सरकारला सत्तेवर ठेवणार नाहीत, संधी मिळेल तेव्हा त्यांचा पराभव करतील, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com