Eknath Khadse-Girish Mahajan
Eknath Khadse-Girish Mahajan Sarkarnama
विशेष

फडणवीसांसोबत बसून खडसेंना काय मिटवायचं होतं : महाजनांच्या गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तुम्ही आणि मी बसून सगळं मिटवून टाकू, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आपल्याला नाशिकमध्ये म्हणाले होते, असा दुसरा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. त्यामुळे खडसेंना काय मिटवायचं आहे, याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. (Khadse said 'Fadnavis, you and I will sit down and clear everything': Mahajan's claim)

मंत्री महाजन हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंबाबत दोन मोठे गौप्यस्फोट केले. तब्बल तीन तास बसवून ठेवूनही खडसेंना अमित शहांनी भेट दिली नाही, असाही गौप्यस्फोट महाजन यांनी केला आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का, याची चर्चा सुरू झाली आहे.

महाजन म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात एकत्र बसलो होतो, त्यावेळी खडसेसाहेब माझ्याजवळ आले आणि ‘एकदा आपण बसू. सगळं मिटवून टाका, जाऊ द्या,’ असे मला म्हणाले होते. खडसे यांच्या मनात सध्या काय चाललं आहे आणि काय मिटवायचं हेातं. ते मात्र मला कळलं नाही. कारण त्या ठिकाणी गर्दी एवढी हेाती आणि गोंधळ इतका होता, त्यामुळे मी त्यांना काय मिटवायचं आणि काय ठेवायचं, असं विचारलंही नाही.

एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, नाथाभाऊंच्या मनात काय आहे, हे मला माहिती नाही. पण, भारतीय जनता पक्ष काय निर्णय करतो, हेही महत्वाचे आहे. आतापर्यंत त्यांची भाजपमध्ये २० वर्षे घुसमट होत होती. एवढ्या साऱ्या लाल दिव्याच्या गाड्या, वीस-वीस एवढी सर्व पदांवर असताना घुसमट होत होती. आता राष्ट्रवादीत जाऊन केवळ एकाच वर्षात त्यांची कशी काय घुसमट होऊ लागली, हे मला कळतच नाही. त्यांनी थोडं जरा सबुरीने घेतलं पाहिजे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा संदेश खडसेंनी अंमलात आणावा. त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे राष्ट्रवादीतही मिळेल, असा सल्लाही गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT