तीन तास बसवून ठेवूनही अमित शहांनी खडसेंना भेट दिली नाही : गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

ही माहिती आपल्याला खुद्द रक्षा खडसे यांनीच दिली आहे, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला
Girish Mahajan-Amit Shah-Eknath Khadse
Girish Mahajan-Amit Shah-Eknath KhadseSarkarnama

जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या कार्यालयाबाहेर तब्बल तीन तास बसूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि खासदार रक्षा खडसे यांना भेट दिली गेली नाही, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. ही माहिती आपल्याला खुद्द रक्षा खडसे यांनीच दिली आहे, असा दावाही त्यांनी केला. (Amit Shah did not visit Khadse even after sitting for three hours : Girish Mahajan)

मागील आठवड्यात एकनाथ खडसे हे भाजपचे नेते अमित शहा यांना भेटायला दिल्लीत गेले होते, त्यावेळी शहा यांची खडसे यांच्यासोबत भेट होऊ शकली नव्हती. त्या भेटीबाबत ग्रामविकास मंत्री महाजन यांनी आज गौप्यस्फोट केला.

Girish Mahajan-Amit Shah-Eknath Khadse
ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर सरन्यायाधीश लळित, महाधिवक्ता कुंभकोणींना भेटले; पण...

महाजन म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे बाहेर बसले आहेत, असा आपल्याला तेथूनच फोन आला होता. त्यावेळी मी माहिती घेतली. रक्षा खडसे यांना विचारले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, आम्ही जवळपास तीन तास शहा यांच्या कार्यालयाबाहेर बसलो आहोत. पण, आम्हाला वेळ दिली गेली नाही किंवा भेटायला नकार दिला गेला. त्यामुळे खडसे आणि शहा यांची भेट काही झालेली नाही, एवढं मात्र निश्चित.

Girish Mahajan-Amit Shah-Eknath Khadse
लाच घेताना रंगेहाथ पकडलं अन् बर्थ डे सेलिब्रेशनऐवजी हाती पडल्या बेड्या!

एकनाथ खडसे यांच्या मनात काय आहे, हे मला माहिती नाही. पण, भारतीय जनता पक्ष काय निर्णय करतो, हेही महत्वाचे आहे. आतापर्यंत त्यांची भाजपमध्ये २० वर्षे घुसमट होत होती. एवढ्या साऱ्या लाल दिव्याच्या गाड्या, वीस-वीस एवढी सर्व पदांवर असताना घुसमट होत होती. आता राष्ट्रवादीत जाऊन केवळ एकाच वर्षात त्यांची कशी काय घुसमट होऊ लागली, हे मला कळतच नाही. त्यांनी थोडं जरा सबुरीने घेतलं पाहिजे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा संदेश खडसेंनी अंमलात आणावा. त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे राष्ट्रवादीतही मिळेल, असा सल्लाही गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com