devendra fadnavis | nana patole sarkarnama
विशेष

Devendra Fadnavis Vs Nana Patole : सबसे बडा खिलाडी कौन ? फडणवीस की नानाभाऊ…

Lok Sabha Election 2024 Who will be supreme in maharashtra Devendra Fadanavis BJP or Nana Patole Congress : विदर्भातील उमेदवार निवडीचे अधिकार पटोले आणि फडणवीस यांना दिले होते. हे बघता या दोन्ही नेत्यांसाठी विदर्भातील लोकसभा निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

Akshay Sabale, सरकारनामा ब्यूरो

Nagpur News, 3 June : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातील प्रमुख नेते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विदर्भातील सबसे बडा खिलाडी कोण याचे उत्तर मिळणार आहे.

विदर्भातील सर्व 10 जागांवर अतिशय अतितटीचा सामना झाला. 2019 मध्ये काँग्रेसचा ( Congress ) एकच उमेदवार तोही बाळू धानोरकर यांच्या रूपानं चंद्रपूरमधून निवडून आला होता. उर्वरित आठ जागांवर भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. अमरावतीच्या नवनीत राणा ( Navneet Rana ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे 'किंगमेकर' ठरले होते.

2019 नंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री तुटली. अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीची राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर नाना पटोले यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले. आता फडणवीस आणि पटोले यांच्याच नेतृत्वात लोकसभेची निवडणूक लढली गेली. विदर्भातील उमेदवार निवडण्याचे सर्व अधिकार नाना पटोले ( Nana Patole ) तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. हे बघता या दोन्ही नेत्यांसाठी विदर्भातील लोकसभा निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

अनेकांचा विरोध झुगारून नाना पटोले यांनी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अकोला येथील उमेदवार ठरवले. नागपूरमध्ये विकास ठाकरे यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात उतरवलं. चंद्रपूरमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विरोध होता. त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी या जागेवर दावा ठोकला होता. पण, नाना पटोले यांनी कोणालाही न जुमानता धानोकर यांना तिकीट दिलं.

भाजपने येथे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. ओबीसींमध्ये असंतोष खदखदत असतानाही माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना डावलून भाजपने मुनगंटीवार यांच्यावर डाव लावला. भंडारा आणि गडचिरोली या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं नवे चेहरे दिले.

भंडारा-गोंदियात डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला. भाजपने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली. मात्र, भाजपला येथे देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास माजी आमदार परिणय फुके लोकसभेसाठी इच्छुक होते. प्रफुल्ल पटेल यांनी फुके यांच्या नावाला विरोध केल्याचे समजते. गडचिरोली येथे भाजपने पुन्हा विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने मतदारसंघाच्या बाहेरचे असतानाही नामदेव किरसान यांना उमेदवारी देऊन आणखी एक धक्का दिला.

वर्धा मतदारासंघात भाजपचे तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या वाट्याला गेला. येथून राष्ट्रवादीने काँग्रेसचेच माजी आमदार अमर काळे यांना आयात करून उमेदवारी दिला.

रामटेक लोकसभेसाठी भाजप प्रचंड आग्रही होती. शिंदेंनी जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करून शिंदे सेनेनं काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांना आयात केले. या मतदारसंगात माजी मंत्री सुनील केदार यांचा दबदबा आहे. त्यांचे आणि फडणवीस यांचे उभे वैर आहे. केदार यांनी श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.

अमरावतीत भाजपने नवनीत राणा तर काँग्रेसने विद्यमान आमदार बळवंत वानखेडे, अकोल्यात भाजपने खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना संधी दिली. काँग्रेसनं अभय पाटील रिंगणात उतरवले आहे. यवतमाळ आणि बुलढाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात लढत होत आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT