Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आनंद गगनात मावेना; कारण...

FDI News : थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या 'डीपीआयआयटी'ने जाहीर केलेली आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

BJP leader Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरीत होत असताना थेट परकीय गुंतवणुकीत गुजरातला मागे टाकत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी अवलस्थानी आल्यानं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या खुशीत, फडणवीसांनी 'बोलायला नाही, कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते', असा विरोधकांना चिमटा घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या ट्विटरवर थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी शेअर करत कौतुक करून घेतलं आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2022-23 आणि 2023-24, अशी सलग दोन वर्ष महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे. केंद्र सरकारच्या 'डीपीआयआयटी'ने याबाबत गुरूवारी (ता. 30) आकडेवारी जाहीर केली आहे.

या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये 1 लख 25 हजार 101 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. हीच गुंतवणूक 2022-23 मध्ये 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपये होती. या गुंतवणुकीत यावर्षी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक ही दुसऱ्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असे सांगून महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात महाराष्ट्र पिछाडला होता, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना घेतला.


Devendra Fadnavis
Maharashtra Assembly Election : विधानसभेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला? दिवाळीपूर्वीच उडणार बार

दरम्यान, गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरीत झाले आहे. तसेच पुण्यातील हिंजवडीच्या आयटी पार्कमधील 37 कंपन्यांनी स्थलांतरी केल्याची माहिती समोर आली. यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यात सुरूवात केली आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर करून अंगावर येत असलेल्या विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.


Devendra Fadnavis
Lok Sabha Election News: अजितदादांचे उमेदवार निवडून येऊ नयेत यासाठी शिंदे गटाची फिल्डिंग, ठाकरे गटाचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com