नांदेड लोकसभा वसंतराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर अशी लढत Sarkarnama
विशेष

Lok Sabha 2024 Nanded: नांदेडच्या एका चव्हाणांची उणीव काँग्रेसचे चव्हाण भरून काढतील का?

Laxmikant Mule

नांदेड : काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला यंदा प्रथमच अशोक चव्हाण यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. ही निवडणूक काँग्रेसच्या Indian National Congress नेतृत्वाची कसोटी पाहणारी आहे.

अशा कठीण परिस्थितीत तीन वेळा आमदार राहिलेले वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाचे BJP उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी आपली शक्ती पणाला लावून ही जागा काँग्रेसकडे खेचून आणावी लागणार आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता या जागेवर चार वेळचा अपवाद वगळता या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या पराभव करून प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडून आले होते. नांदेडच्या राजकारणात दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. Lok Sabha Election 2023 Fight in Nanded Between Prataprao Patil Chikhlikar of BJP and Vasantrao Patil Congress

देशात मोदी लाट असतानाही २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे निवडून आले होते. त्यांनी आता भारतीय जनता पक्षात Bhartiya Janata Party प्रवेश केला असून, याचा मोठा फटाका काँग्रेसला बसला आहे. नांदेडच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी वेगवेगळी नावे चर्चेत आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे नाव अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे प्रस्तावित केले होते.

नांदेडची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. या जागेवर काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते याकडे लक्ष लागले होते. या जागेवर घोषित करण्यात आलेले उमेदवार वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार Sharad Pawar यांच्याशी एकनिष्ठ होते.'राष्ट्रवादी ने त्यांना २००२ मध्ये विधान परिषदेवर नियुक्त केले, पण २००९ मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली.

हेदेखील वाचा -

ते २०१४ मध्ये दुसऱ्यांदा विजयी झाले होते, पण वसंतराव चव्हाण यांचा २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश पवार यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. गेल्या महिन्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला व उमेदवारी घोषित केली आहे.

त्यांचा नायगाव, उमरी, धर्माबाद,देगलुर बिलोली मुखेड या भागात चांगला जनसंपर्क आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली आहे. तसेच या निवडणुकीत त्यांना अशोक यांची साथ मिळणार आहे. भाजप व अशोक चव्हाण यांच्या आव्हानाला तोंड देत ही जागा वसंतराव चव्हाण यांना परत जिंकून आणावी लागणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT