Lok Sabha 2024 - भाजपचा प्रचाराचा नवा फंडा Sarkarnama
विशेष

Lok Sabha 2024 : मतदारांचा कल जाणण्यासाठी भाजपची रुग्णालयापर्यंत उडी!

Lok Sabha 2024 निवडणूक जिंकण्यासाठी आभासी पातळीवर आणि प्रत्यक्ष जमिनीवरही भाजपकडून सूक्ष्म नियोजन केले जाते. प्रचाराचा असाच एक नवीन फंडा भाजपने या निवडणुकीत अमलात आणला आहे. मात्र, याद्वारे भाजप शासकीय यंत्रणांचा गैरवापर करतोय का, अशा समजाला बळ मिळत आहे.

अय्यूब कादरी

निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विविध प्रकारचे मार्ग अवलंबले जातात. समाजमाध्यमांची चलती सुरू झाल्यानंतर प्रचाराचे रूप पालटून गेले आहे. आधुनिक माध्यमांचा प्रचारासाठी Election Campaign वापर करण्यात भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याची, आपले नॅरेटिव्ह सेट करून निवडणूक जिंकण्याची एकही संधी भाजप BJP सोडत नाही.

भाजपला निवडणुकीत Elections मिळणाऱ्या यशाचे हेही एक रहस्य आहे. आता 2024 च्या निवडणुकीतही राज्यात भाजपने प्रचाराचा एक नवीनच फंडा आणला. मात्र, त्यामुळे शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. Lok Sabha 2014 Campaign Tactics of Bhartiya Janata Party in Dharashiv Constituency

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. पानटपरी, चहाचे हॉटेल, चावडी आणि गावांतील पारांवरही निवडणुकीच्या गप्प रंगू लागल्या आहेत. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर Omprakash Raje Nimbalkar यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. तिन्ही पक्षांनी धाराशिव Dharashiv मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

त्यामुळे महायुतीतील कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सुटणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे अर्थातच उमेदवारही ठरलेला नाही. इच्छुक जास्त असल्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांत या मतदारसंघांसाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबत तर्कवितर्क लावले जात असून, नागरिकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

हेदेखील वाचा -

आभासी प्रचारात भाजप नेहमी आघाडीवर असतो. जमिनीवरही भाजपची बूथ लेव्हलपर्यंत भक्कम यंत्रणा आहे. उस्मानाबाद मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी Pravin Singh Pardeshi यांच्यासाठी मतदारसंघाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

धाराशिवसह सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांत विस्तार असलेल्या या मतदारसंघातील जवळपास दीड लाख नागरिकांशी परदेशी यांच्या यंत्रणेने संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. त्यातून निष्कर्ष काय निघाले, हे अर्थातच गुलदस्त्यात आहे, मात्र उमेदवारीसाठी परदेशी यांचे नाव अद्यापही चर्चेत आहे. भाजपकडून एखादा इच्छुक उमेदवार इतकी तयारी करू शकतो तर भाजप पक्ष म्हणून कोणत्या पातळीवरील तयारी करत असेल, याचा अंदाज यायला हवा.

शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर संबंधित महिलेचा किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याच्या मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला जातो. शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर संबंधित महिलेला शासनाकडून ठराविक रक्कम दिली जाते. उमरग्यातील (जि. धाराशिव) एका व्यावसायिकाच्या पत्नीची प्रसूती उपजिल्हा रुग्णालयात झाली होती.

त्यावेळी त्या व्यावसायिकाचा मोबाइल क्रमांक नोंदवून घेण्यात आला होता. त्या क्रमांकावर त्यांना नुकताच एक कॉल आला. कॉलर आयडीवर भाजप महाराष्ट्र प्रदेश असे लिहून आले. कॉल करणाऱ्याने व्यावसायिकाकडे त्यांच्या पत्नी आणि बाळाची चौकशी केली. शासनाकडून दिली जाणारी रक्कम मिळाली किंवा नाही याचीही चौकशी केली.

इथपर्यंत सारे ठिक होते. नंतर कॉल करणारा मूळ मुद्द्यावर आला. राज्यात, देशात भाजप निवडून येणार की नाही, असा प्रश्न त्याने विचारला. धाराशिव मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी होणार किंवा नाही, असेही त्याने त्या व्यावसायिकाला विचारले. व्यवसाय करणारे लोक राजकारणाबद्दल सहसा खुलेपणाने मत व्यक्त करत नाहीत. कॉल करणाऱ्याने राजकीय प्रश्न विचारल्याने तो व्यावसायिक विचारात पडला.

राजकीय प्रश्न का विचारत आहात, असे त्यांनी कॉल करणाऱ्याला विचारले. त्यामुळे तिकडून कॉल कट करण्यात आला. प्रचारासाठी, मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भाजपने असे सूक्ष्म नियोजन केले आहे. मात्र, यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर तर केला जात नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT