Vidhan Parishad Sarkarnama
विशेष

Vidhan Parishd Election News : लोकसभेनंतर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत महायुती रिस्क घेणार का ?

Mahayuti Politics News : विधान परिषद निवडणूक लढाईची की बिनविरोध करायची यावरून अजून एकमत झाल्याचे दिसत नाही. 12 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागेसाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ही विधान परिषद निवडणूक लढाईची की बिनविरोध करायची यावरून अजून एकमत झाल्याचे दिसत नाही. 12 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

महायुतीकडे 200 पेक्षा अधिक आमदार असल्याने 9 जागा निवडून येईल एवढे संख्याबळ आहे. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या (MVA) वाट्याला येतील, असे चित्र आहे. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला पाच जागा येतील तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा येतील अशी परिस्थीती आहे. (Vidhan Parishd Election News)

दुसरीकडे दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार असून त्यापैकी एक जागा काँग्रेसला मिळणार आहे. तर शिवसेना (Shivsena)उद्धव ठाकरे गटाचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदाराच्या मदतीने शेकापचे जयंत पाटील पुन्हा निवडून येतील एवढे संख्याबळ आहे. भाजपच्या वाटायला येणाऱ्या पाच जागांसाठी 35 जणांनी उमेदवारी भाजप प्रदेश कार्यालयाकडे मागितली आहे.

त्यामुळे येत्या काळात वाट्याला येणाऱ्या जागा दोन्ही पक्ष लढवल्या तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोणत्या पक्षाने जर जास्त उमेदवार उभा केला तर निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सध्या तरी महायुती किंवा महाविकास आघाडी रिस्क घेईल, असे वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने (Bjp) विरोधी दोन पक्ष फोडले. तर काँग्रेसचे काही नेते पळवून नेले. त्याचा फटका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी इच्छुकची बरीच गर्दी असली तरी महायुती निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका

2022 च्या जूनमध्ये विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत चमत्कार झाला आणि त्यातून राज्यात सत्ता परिवर्तन झाले होते. आता सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक 12 जुलैला होणार आहे. विधानसभेचे आमदार हे या निवडणुकीसाठी मतदार असणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याने व आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असेल, असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT