Uddhav Thackeray, Sharad Pawar, Balasaheb Thorat, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Balasaheb Thorat, Devendra Fadnavis sarkarnama
विशेष

रविवारच्या रात्रीच ठरणार गेम कोणाचा होणार? लाड, जगताप की तिसराच...

अमोल जायभाये

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. पूर्ण ताकदीने राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरुनही महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर आता २० जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी पुन्हा कंबर कसली आहे. त्यासाठी बैठका आणि आमदारांची जमवाजमव सुरु झाली आहे. (Legislative Council Election Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये मुंबईत ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपनेदेखील (BJP) आपले आमदार जमवले आहे. चारही पक्ष आकडेमोडीमध्ये व्यस्थ आहे. राज्यसभा निवडणुकीमुळे आघाडीकडून यावेळी खबरदारी घेतली जात आहे. आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली जात असून पक्षातील मोठ्या नेत्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हॉटेल ट्रायडेंटमध्ये आहे. त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट इनमध्ये असून मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते येथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे उद्या शिवसेनेचा वर्धापन दिनदेखील येथेच साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार तसेच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.

काँग्रेसच्या (Congress) आमदारांनादेखील हॉटेल फोर सिझनमध्ये ठेवण्यात आले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. येथे आमदारांना मतदानाच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. भाजपनेदेखील आकडेमोड सुरु केली असून या पक्षाच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवून, असे भाजपने यापूर्वी बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजपनेदेखील रणनीती आखायला सुरुवात केली आहे. येथे भाजपचे बडे नेते विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गणित जुळवत आहेत.

सोमवारी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक ही गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच कारणामुळे चारही पक्षांनी आपल्या आमदारांना चार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले असून आपापल्या स्तरावर रणनीती आखली सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT