Mallikarjun Kharge, Nana Patole, Rahul Gandhi Sarkarnama
विशेष

Congress News : मुंबई, कोल्हापुरप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतरही बसणार काँग्रेसला धक्का?

Congress Setback after Mumbai and Kolhapur: आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही अनेक काँग्रेस नेत्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकापूर्वी राज्यातील काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह नांदेड जिल्ह्ह्यातील आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासह अनेक माजी आमदारांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही अनेक काँग्रेस नेत्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. (Congress News)

चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसने (congress) दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसात महायुतीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे जाणाऱ्या नेतेमंडळींचा ओढा वाढला होता. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या जोरावर काँग्रेस विधानसभा निवडणुकीत आघाडीकडून सर्वाधिक जागा पदरात पाडून घेत मोठा भाऊ ठरला होता.

आघाडीमधील जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसला काही हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे काही ठिकाणी पक्षात नाराजी उफाळली. त्यातून पुन्हा पक्षांतर आणि बंडखोरीला ऊत आले. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी कापल्यानं विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला रामराम करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा नाराजीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा मोठा फटका बसला आहे.

रवी राजा हे काँग्रेस पक्षातून पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तब्बल 25 वर्षांचा नगरसेवकपदाचा त्यांना अनुभव आहे. ते मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहे. सायन-कोळीवाडा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव होता. त्यामुळे नक्क्कीच या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसला फायदा झाला असता मात्र त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayshree Jadahv) यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

या मतदारसंघात काँग्रेसकडे दमदार उमेदवार नसताना उमेदवार बदलल्याने काँग्रेसला याठिकाणी मोठा फटका बसला आहे. यंदा पक्षाकडून मधुरीमाराजेंना उमेदवारी देण्यात आली. यामुळे आमदार जयश्री जाधव नाराज झाल्या असून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप 20 दिवसाचा कालावधी असून त्यामुळे निवडणुकीपर्यंत काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली तर मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागणार आहे, त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT