Mahayuti Politics : शिंदे, फडणवीस अन् अजितदादा ‘या’ दोन मतदारसंघात करणार नाहीत एकत्रित प्रचार?

Maharashtra Assembly Election Mahim Mankhurd Shivajinagar BJP : माहिम व मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीची कोंडी झाली आहे. त्यामुळे तिथे महायुतीची प्रचाराची रणनीती कशी असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपल्यानंतर बहुतेक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक मतदारसंघात महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी झाली आहे. याबाबत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर चित्र स्पष्ट होईल. पण महाराष्ट्रातील दोन हायप्रोफाईल मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर बहुतेक ठिकाणी महायुतीकडून एकत्रित सभा घेण्याचे नियोजन दिसते. प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अनेक मतदारसंघात एकत्रित सभा होऊ शकतात. पण दोन असे मतदारसंघ आहेत जिथे हे तिन्ही नेते तर सोडाच पण इतर नेते व पदाधिकारीही एकत्रित येण्याची शक्यता नाही.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Kolhapur Assembly News : बंडखोरांनी फोडला घाम! बंड थंड करण्यासाठी हालचालींना वेग

पहिला मतदारसंघ म्हणजे मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर. भाजपने कडाडून विरोध केलेल्या नवाब मलिकांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म जोडत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे. भाजपने मलिकांना आपला विरोध कायम राहील, असे सांगत त्यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. भाजपने नेत्यांकडून शिवसेनेचा उमेदवार महायुतीचा अधिकृत उमेदवार असून त्यांचाच प्रचार करू स्पष्ट केले आहे.

या मतदारसंघात नवाब मलिकांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील की नाही, लवकरच स्पष्ट होईल. पण, अद्याप अजित पवारांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ते मलिकांचा प्रचार करायला जाणार की नाही, याबाबतही उत्सुकता आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Mahayuti : महायुतीसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची; खासदार, विधानपरिषदेच्या 'या' आमदारांना उतरवले रिंगणात

दुसरा मतदारसंघही मुंबईतील असून हायप्रोफाईल ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणून फडणवीसांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

माहिममध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल आहे. त्यांनी अर्ज दाखल करू नये, यासाठी जोरदार प्रयत्नही झाले. मात्र, सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास ते शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील. पण भाजपचा त्यांना पाठिंबा नसेल. त्यामुळे इथेही महायुतीतील नेत्यांची प्रचारात कोंडी होणार आहे.

दोन्ही मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराची रणनीती काय असेल, हे समोर येईल. पण जैसे थे स्थिती राहिल्यास महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांसह इतर नेते व पदाधिकारीही एकत्रित प्रचार करणार नाहीत, हे स्पष्टच आहे.    

 इतर काही मतदारसंघातही तीच स्थिती?

काही मतदारसंघातही महायुतीतील दोन-दोन अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत पक्षाचे एबी फॉर्मही जोडण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरही जैसे थे स्थिती राहिल्यास या मतदारसंघातही युतीतील नेत्यांची कोंडी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Prakash Ambedkar, Eknath Shinde
Amravati Teacher MLC Election | Mahayuti and MVA
Devendra fadnavis, ravindra chavan
Ahilyanagar DCC Bank Election