Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विशेष

Chandrashekhar Bawankule: निवडणुकीची धामधूम, प्रचाराचा अखेरचा दिवस; याच राजकीय धावपळीत बावनकुळेंचा 'बर्थ डे'; पण मिळालं मोठं गिफ्ट

BJP Leader Chandrashekhar Bawankule News: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंगळवारी(ता.13)वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पण याचदरम्यान,त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Deepak Kulkarni

Chandrashekhar Bawankule News: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं. त्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं विधानसभेचा स्ट्राईक रेट कायम राखत नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दमदार कामगिरी केली होती. यानंतर आता भाजपनं राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. यात महसूलमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही (Chandrashekhar Bawankule) झंझावाती प्रचार करत राजकीय वातावरण तापवलं आहे. त्यांनी निवडणुकीची प्रचंड धावपळ सुरू असून विरोधकांच्या आरोपांचे हल्ले परतवून लावतानाच भाजपच्या विकासकामांना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठीही ताकद लावली आहे. याचदरम्यान,बावनकुळेंना एक मोठं गिफ्ट मिळालं आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंगळवारी(ता.13)वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. पण याचदरम्यान,त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये लेकीनं दिलेल्या शुभेच्छांमुळे एरवी कणखर बाणा मिरवणारे बावनकुळे जरासे हळवे झाल्याचं दिसून येत आहे.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात,मध्यरात्री माझी कन्या सौ. पायलचा मोबाईलवर मेसेज आला. सध्या प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आमचं बोलणं बहुतेकवेळा मेसेजवरच होतं.रोजचाच काहीतरी सांगणारा मेसेज असेल असं वाटलं,पण जन्मदिनाच्या शुभेच्छांचा तो मेसेज वाचून माझे डोळे पाणावले.

पायल, तुझ्या भावना वाचून मन भरून आलं. तुझं प्रेम, आदर आणि समजूतदारपणा हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. तुझा मला कायम अभिमान आहे. मी कायम तुझ्या आणि संकेतच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही दोघेही माझी ऊर्जा आहात. भाजप (BJP)नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी याचवेळी आपल्या लेकीला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले.

बावनकुळेंच्या मुलीची नेमकी पोस्ट काय..?

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा पप्पा...आजचा दिवस तुमचा आहे…पण माझ्यासाठी हा दिवस तुमच्या ऋणांची, तुमच्या उपकारांची आणि तुमच्या अस्तित्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देणारा आहे.तुमच्याबद्दल मनात असलेला आदर आणि प्रेम इतकं खोल आहे की,कधी कधी फोन करून तुमची तब्येत विचारायलाही मला धीर होत नाही.ही भीती अंतराची नाही,तर या नात्याच्या पवित्रतेची आहे.पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मी तुमचा विचार करत नाही असंही बावनकुळेंची लेकीनं म्हटलंय.

खरं सांगायचं तर,असा एकही क्षण नाही…एकही सेकंद नाही…ज्यात माझ्या मनात तुमचं नाव नसतं.आयुष्यात तुम्ही मला जे दिलं आहे,ते शब्दांत मांडणं अशक्य आहे.तुम्ही दिलेला आधार केवळ आधार नव्हता,तो माझ्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा विश्वास होता.कदाचित एखादा वडील आपल्या मुलालाही जे देऊ शकत नाहीत,त्याही पलीकडचं तुम्ही मला दिलंत.

मला कधीच भौतिक गोष्टींची हाव नव्हती,नाही आणि कधीच नसेल.पैसा, पद, नाव यापेक्षा माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट अमूल्य आहे.तुमचं अस्तित्व.कारण तुम्ही असणं म्हणजे सुरक्षिततेची छाया,निश्चिंततेची भावना आणि आयुष्यभर साथ देणारा आधाराचा हात आहे,असंही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची कन्या,पायल यांनी मेसेजमध्ये म्हटलंय.

तुमचा सन्मान, तुमचं चारित्र्य आणि तुमचं मोठेपण इतकं महान आहे की,तुम्ही माझ्यासाठी फक्त एक व्यक्ती नाही…तुम्ही माझ्यासाठी जिवंत देव आहात.माझी प्रत्येक इच्छा,बोललेली असो वा न बोललेली, तुम्ही नेहमी पूर्ण केलीत. कधी शब्दांनी,कधी कृतीने,तर कधी फक्त तुमच्या उपस्थितीने. मला पूर्ण विश्वास आहे की, पुढेही तुम्ही तसंच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पप्पा, मनापासून एक गोष्ट सांगायची आहे.तुम्हाला माझ्यावर अभिमान वाटावा,हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा आहे.तुमच्या माझ्याकडून असलेल्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझं शंभर टक्के देत आहे आणि पुढेही देत राहीन.तुमच्या शिकवणीला,तुमच्या विश्वासाला आणि तुमच्या नावाला कधीही कमी पडू देणार नाही. ही माझी स्वतःशी आणि तुमच्याशी दिलेली वचनबद्धता आहे.

या आयुष्यात मी तुमचे सर्व उपकार कसे फेडू शकेन. हे मला खरंच माहीत नाही…कदाचित ते शक्यही नसेल.पण माझ्या प्रत्येक श्वासात,प्रत्येक यशात आणि प्रत्येक प्रार्थनेत तुमचं नाव कायम असेल. आणि देवाकडे मनापासून एकच मागणं आहे. हर जन्म मला तुम्हीच वडील म्हणून लाभा. तुम्ही मला लाभलात, हेच माझ्या आयुष्यातलं. सर्वात मोठं भाग्य असल्याचंही पोस्टच्या शेवटी बावनकुळेंच्या कन्या पायल यांनी नमूद केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT