Narayan Rane-Ajit Pawar
Narayan Rane-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Ajit Pawar Vs Rane : राणेंचे चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले; बारामतीत येऊन पवारांचे १२ वाजून दाखविण्याचे दिले प्रतिआव्हान

मिलिंद संगई

बारामती : नारायणराव राणे (Narayan Rane), तुमचे आव्हान राष्ट्रवादीने (NCP) स्वीकारले आहे. आपण बारामतीत (Baramati) येऊन अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारा वाजून दाखवाच...’ असे प्रतिआव्हान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी राणेंना दिले आहे. (NCP counter challenge to Narayan Rane)

या संदर्भात अंकुश काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करत नारायण राणे यांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारत आहे. तुम्ही बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजून दाखवा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, युवक, महिला तुमचे बारामतीत स्वागत करण्यास उत्सुक असतील, असे सांगण्यासही अंकुश काकडे या क्लिपमध्ये विसरलेले नाहीत.

अजित पवार यांनी नारायण राणे यांची पुण्यातील निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘राणेंना एका बाईनं पाडलं’ अशी खिल्ली उडवली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी अजित पवार यांना आव्हान देत माझ्या फंद्यात पडू नका. नाही तर मी पुण्यात, बारामतीत येऊन तुमचे बारा वाजवीन, असा इशारा दिला होता.

नारायण राणे यांच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या इशाऱ्याची खिल्ली उडवत अजितदादा सोडा, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता तुमचे आव्हान स्वीकरतो, असे प्रत्युत्तर दिले आहे. अंकुश काकडे यांनी थेट नारायण राणे यांचे आव्हान आम्ही स्वीकारत असून त्यांनी बारामतीत येऊन बारा वाजून दाखवावेतत, असे प्रति आव्हान दिल्याने आता हा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नारायण राणे यांना चिमटा काढताना अंकुश काकडे यांनी ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले, मुख्यमंत्रीपद दिलं, त्या शिवसेनेला सोडून आता तुम्ही भाजपसोबत गेला आहात, अशा शब्दांत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. अंकुश काकडे यांच्या या क्लिपनंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आक्रमक होणार अशी चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT