Rane Vs AjitDada : माझ्या फंद्यात पडू नका; नाही तर पुण्यात येऊन बारा वाजवीन : नारायण राणेंचे अजितदादांना प्रत्युत्तर

बारामतीच्या बाहेर पडून त्यांनी दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या भानगडीत पडू नये.
Narayan Rane-Ajit Pawar
Narayan Rane-Ajit PawarSarkarnama

कोल्हापूर : ‘अजितदादाला (Ajit Pawar) बारामतीबाहेर राजकारण कितपत कळतं, हे मला माहिती नाही. त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. ते ज्या प्रकारचे राजकारणी आहेत, त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर पडून त्यांनी दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या भानगडीत पडू नये. माझ्या फंद्यात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन बारा वाजवीन,’ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिला. (Narayan Rane's Answer to Ajit Pawar)

चिंचवड येथील पोटनिवडणुकीत नाना काटे यांच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर नारायण राणेंचा दोनदा पराभव झाला. एकदा तर बाईनं पाडलं, असे विधान केले होते. त्यावर राणे यांनी आज कोल्हापुरात प्रतिक्रिया देताना हा इशारा दिला आहे.

Narayan Rane-Ajit Pawar
Rajan Patil On BJP Entry : 'बबनदादा माझे दाजी; त्यांचा निर्णय तो आमचा निर्णय' : राजन पाटलांनी भाजप प्रवेशाची बंदूक ठेवली शिंदेंच्या खांद्यावर

माझे कार्यक्षेत्र हे मुंबईत होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठविले. तिकडून मी सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘आप बांद्रासे खडे हो जाएये’ असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून मी मुंबईत पोटनिवडणुकीला उभा राहिलो. माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नाही. बरं मला पाडलं. महिला असो अथवा पुरुष. उमेदवार तो उमेदवार. त्यात महिला आणि पुरुषामध्ये काय आहे. आता ती महिला उमेदवार कोणाकडे आहे, असा सवालही राणे यांनी या वेळी केला.

Narayan Rane-Ajit Pawar
Solapur News : मोहोळच्या राजकारणाला कलाटणी : उमेश पाटलांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन घेतली रमेश कदमांची भेट

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरून रंगलेल्या श्रेयवादावरूनही राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले की, सगळंच मी केलं, असं उद्धव ठाकरे म्हणतात. केंद्र सरकारने त्यासंदर्भात नोटिफिकेशन कधी काढलं, कुणाच्या राजवटीत निघालं, हे महत्वाचं आहे. कोकणाच्या मातीत सोन्याचा अंश असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे. मागेही असा अहवाल आला हेाता. ती राष्ट्रीय संपत्ती आहे, राणे कुटुंबाची नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com