NOTA Voting
NOTA Voting Sarkarnama
विशेष

NOTA Votes : कर्नाटकात अपक्षाला ‘नोटा’ ठरला भारी : प्रत्येक मतदारसंघात सरासरी १२०० मते

सरकारनामा ब्यूरो

बेळगाव : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला मतदाराने अधिक पसंती दाखविली आहे. राज्यात २२४ मतदारसंघातून प्रत्येक मतदारसंघात सरासरी १२०० मते नोटाला पडली आहेत. (Nota votes higher than independent candidates in Karnataka)

मतदारसंघात आपल्याला जर एकही उमेदवार मतदानासाठी पात्र दिसत नसेल तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतदान यंत्रात नोटा (Nota नॉन ऑफ अबोव्ह) म्हणजेच यापैकी एकही उमेदवार नको हे ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे. ज्याचा पुरेपूर वापर आता मतदार करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राज्यात झालेल्या एकूणच मतदानापैकी २ लाख ६९ हजार ७६३ मतदान हे नोटाला झाले आहे. एकूण मतदानाची ही ०.७ इतकी टक्केवारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटाला मतदान होत असल्याने निवडणूकीतील उमेदवार या मतदारांना नकोसे आहेत हे स्पष्ट होते.

नोटाचा सर्वाधिक अधिकार महादेवपुरा मतदार संघात बजावण्यात आला आहे. या ठिकाणी ४ हजार ७७५ मतदारानी नोटाचे बटन दाबले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंजुळा एस. येथे विजयी ठरले. धर्मनिरपेक्ष जनता दल आणि आम आदमी पार्टी पेक्षाही या ठिकाणी नोटाला अधिक मतदान झाले. धजद उमेदवाराला येथे केवळ ४५८ मतदान झाले आहे. त्या पाठोपाठ के. आर. पूरा मतदार संघात नोटा अधिक झाला.

भाजप उमेदवार बी. ए. बसवराजू विजयी ठरले आहेत. या ठिकाणी १३ उमेदवार रिंगणात होते. येथे देखील धजद आणि आम आदमी पार्टी पेक्षाही नोटाला अधिक मतदान झाले आहे. नोटाला एकूणच येथे ४३९६ मतदान झाले. मल्लेश्वरम, महालक्ष्मी लेआउट, यशवंतपुर या ठिकाणी २५०० पेक्षा अधिक मतदान नोटाला झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT