PM viksit bharat rozgar yojana Sarkarnama
विशेष

PM VBRY Scheme : पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार 15,000 रुपये! काय आहे 'PM-VBRY' योजना?

How to get Rs 15000 under PM VBRY : PM-VBRY योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या युवकांना 15,000 आर्थिक मदत मिळणार आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि लाभाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारकडून मोठी खुशखबर समोर आली आहे. रोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ (PM-VBRY) अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जात आहे. विशेष म्हणजे संघटित क्षेत्रात प्रथमच नोकरी मिळवणाऱ्या युवकांना एक महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम, कमाल 15,000 पर्यंत, प्रोत्साहन म्हणून दिली जाणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीला गती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात 2,400 कोटींच्या प्रोत्साहन निधीचे वितरण करण्यात आले. देशभरातील 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा मिळाला. याचवेळी विविध राज्यांतील सुमारे 200 ठिकाणी प्रादेशिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईतील वर्सोवा येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार अमित साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात नव्याने रोजगार मिळालेल्या युवकांसह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, नियोक्ते, सरकारी अधिकारी आणि ईपीएफओचे कर्मचारी सहभागी झाले होते. नव्याने नियुक्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचेही वितरण करण्यात आले.

ही योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर उद्योग क्षेत्रासाठीदेखील फायदेशीर ठरत आहे. नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे. उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना अतिरिक्त कालावधीसाठी सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना विस्ताराची संधी मिळत असून रोजगारनिर्मितीलाही वेग मिळत आहे.

PM-VBRY योजनेचा मुख्य उद्देश

अधिकाधिक तरुणांना औपचारिक रोजगार व्यवस्थेत आणणे हा आहे. ऑगस्ट 2025 पासून आतापर्यंत लाखो युवक या उपक्रमाच्या माध्यमातून संघटित क्षेत्रात सहभागी झाले आहेत. रोजगारासोबत आर्थिक सुरक्षितता मिळाल्याने तरुणांच्या करिअरला नवी दिशा मिळत असल्याचे मत लाभार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT