NEET Dress Code : NEET परीक्षेसाठी कडक नियमावली जाहीर : कपड्यांपासून ते चपलांपर्यंत...काय चालणार, काय नाही? वाचा सविस्तर

NTA NEET exam day dress code rules : नीट 2026 परीक्षेसाठी NTA ने ड्रेसकोड आणि परीक्षा केंद्रावरील नियम जाहीर केले आहेत. कोणते कपडे घालावेत, कोणत्या वस्तूंवर बंदी आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
NEET Exam
NEET Exam Sarkarnama
Published on
Updated on

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी उद्या, 21 जून रोजी होणारी NEET परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी आणि कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने यंदा कडक नियम लागू केले आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या वेशभूषेपर्यंत प्रत्येक बाबीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

रविवारी दुपारी 2 वाजता होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ठरावीक ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. धार्मिक कारणांमुळे हिजाब, पगडी, कलावा किंवा इतर धार्मिक प्रतीके परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची परवानगी असली, तरी त्यांना अतिरिक्त तपासणीसाठी इतर विद्यार्थ्यांपेक्षा लवकर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे.

NEET Exam
Education Department : ...तर अधिकाऱ्यांची खैर नाही! राज्यातील सरकारी शाळांच्या तपासणीसाठी शिक्षण विभागाचा नवा आदेश

NTA ने यापूर्वी जारी केलेले प्रवेशपत्र अमान्य ठरवले असून, विद्यार्थ्यांनी नव्याने जारी केलेले वैध प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांची ओळख निश्चित करण्यात येणार आहे.

ड्रेसकोडबाबतही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी साधे आणि आरामदायी कपडे परिधान करावेत. मोठी धातूची बटणे, जाड झिप, चेन किंवा धातूचे अतिरिक्त साहित्य असलेले कपडे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय अंगठ्या, कानातील दागिने, साखळ्या, स्मार्ट वॉच, गॉगल, टोपी, बेल्ट तसेच कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

NEET Exam
Satyajit Tambe : नाशिककरांनो जागे व्हा, हीच वेळ आहे संघर्ष करण्याची... आमदार सत्यजित तांबे झाले सक्रिय !

विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फक्त पारदर्शक बाटली सोबत ठेवण्याची परवानगी असेल. रंगीत किंवा डिझाइन असलेल्या बाटल्या मान्य केल्या जाणार नाहीत. परीक्षेदरम्यान शिस्त आणि निष्पक्षता राखण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी वेळेआधी केंद्रावर पोहोचून सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन NTA कडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com