Solapur News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. गेली अनेक दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. त्यावर आज खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. (Praniti Shinde will be Solapur Lok Sabha candidate : Sushil Kumar Shinde)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सामूहिक बुद्धवंदना करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, देशभरात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होत असतो. दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. मात्र, योगायोगाने मी आज सोलापुरात आहे. यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे.
धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत असतानाच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार लोकसभेच्या उमेदवार असतील, असं त्यांनी जाहीर केलं आहे. मला जे करता येईल, ती मदत मी करणार आहे, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.