Pankaja Munde Dasara Melava 2023 : पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल; कार्यकर्त्यांना काय संदेश देणार?

BJP Leader News : दसऱ्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यासाठी भगवान भक्तीगड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
Pankaja Munde Dasara Melava
Pankaja Munde Dasara Melava Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : दसऱ्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यासाठी भगवान भक्तीगड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे या पांगरी (ता. परळी) येथील गोपीनाथ गडावरून हेलिकॉप्टरने भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या आहेत. त्या काय बोलणार, भारतीय जनता पक्षात होणाऱ्या घुसमटीवर काय भाष्य करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Pankaja Munde (Bhagwangad): Pankaja Munde entered Bhagwan Bhaktigarh)

भगवान गडावरील दसरा मेळाव्याला गडाच्या मठाधिपतींकडून नकार आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी २०१५ मध्ये भगवान गडाच्या पायथ्याला आणि पुढच्या वर्षी २०१६ पासून संत भगवान बाबांचे जन्मगाव भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. यंदा या मेळाव्याचे आठवे वर्ष आहे. कोविडचा कालावधी सोडता गडावर मेळाव्याला गर्दी कायम असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde Dasara Melava
Babandada Shinde Viral Lettar : सोशल मीडियातील व्हायरल पत्रावरून आमदार बबनराव शिंदेंवर मराठा समाजाचा हल्लाबोल्ल

दरम्यान, पांगरी येथील गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे नुकत्याच हेलिकॉप्टरने दाखल झाल्या आहेत. सावरगाव, चिखली, चिंचोली, मूगगाव येथील ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत होत आहे. त्या राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरात दर्शन व आरती करून त्या राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या भव्य मूर्तीस क्रेनने हार घालणार आहेत. थोड्या वेळाने पंकजा मुंडे यांचे मुख्य भाषण होणार आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याआधी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांनी परळीतील वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुंडे कुटुंबीय हे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या आहेत. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्या कोणता संदेश देतात का, हेही पाहावे लागणार आहे.

Pankaja Munde Dasara Melava
Ajit Pawar Vs Jarange Patil : मराठा आरक्षणात आता तुम्हाला मिठाचा खडा टाकायचा आहे का?; जरांगे पाटलांचा अजितदादांना सवाल

पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. याशिवाय जीएसटी विभागानेही त्यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. राज्य सरकारने सोमवारी काही कारखान्यांची थकहमीची जबाबदारी घेतली आहे. मात्र, त्यात पंकजा मुंडे यांचा कारखाना नाही, त्यामुळे भाजप सरकारकडून आर्थिक मदतीसाठी पंकजा मुंडे यांचा कारखाना पुन्हा डावलण्यात आलेला आहे, त्यासंदर्भातही त्या काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Pankaja Munde Dasara Melava
Maratha Reservation : शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची अवहेलना; थोरातांचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com