Dasara Melava 2023 : एका मेळाव्यात लाखो 'वडापाव', तर दुसरीकडे 'घरची शिदोरी' !

Shivaji Park Dasara Melava 2023 : स्वतःच्या जेवणाची सोय, स्वत:च करतात..
Dasara Melava 2023
Dasara Melava 2023Sarkarnama
Published on
Updated on

Azad Maidan Dasara Melava : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अशा दोन्ही गटांच्या बाजूने आज दसरा मेळावा पार पडत आहे. यानिमित्ताने दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडत आहे. यामुळे राज्यभरातून दोन्ही गटांचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. (Latest Marathi News)

Dasara Melava 2023
Eknath Shinde Dasara Melava 2023 : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

शिंदे गटाकडून जेवणाची सोय

आजच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. हजारो शिवसैनिकांची जेवणाची सोय आझाद मैदानावर करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी येणाऱ्या प्रत्येकास फूड पॅकेट आणि पाण्याची बाटली देण्यात येणार आहे. नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचं जेवण यासाठी पॅकेट्स तयार केले जात असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्येकाला एक वडापावचं पॅकेट आणि पाण्याची बाटली प्रत्येकाला दिली जात आहे, तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची तयारी केली जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

घरची भाकरी घेऊन शिवसैनिक शिवाजी पार्कवर

दादर येथील शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. येथेही गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा होतात. ते स्वतःच्या जेवणाची सोय, स्वत:च करतात, असे शिवसैनिकांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Dasara Melava 2023
Shivsena Nashik News : ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून मोठी रसद!

मुंबईतील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सायंकाळी पार पडत आहे, तर त्याचवेळी दादर येथील शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com