history of crime in Pune: पुणे शहरातील वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून विरोधकही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुणे शहरातील गुंडगिरी मोडून नेमकं काढणार कोण? कुचकामी ठरलेली पोलीस यंत्रणा आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणार का? या प्रश्नांनी पुणेकर सध्या चिंतेत आहेत.
विद्येचा माहेरघर, सुसंस्कृत पुणे सध्या गुन्हेगारीच केंद्र बनत आहे. हे सध्या जुन्या पुणेकरांना हे पचवणे अवघड जात आहे. आयटी हब, शिक्षणाचं केंद्र, सांस्कृतिक माहेरघर असलेले पुणे शहर टोळी युद्ध, खून, मारहाण,बलात्कार, गाड्यांची तोडफोड यासारख्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे दहशतीत आहे. गुन्हेगारांना अन् गुडांच्या टोळ्यांना कुठंतरी राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे पोलीस(Police) असून नसल्यासारखे आहेत असा रोष पुणेकर सध्या व्यक्त करत आहेत.
शांत आणि सुंदर असलेल्या पुण्याचा विस्तार 1990 च्या दशकात मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यानंतर शहरा लगतच्या जमिनीचे भाव प्रचंड वाढले. जमिनींना सोन्याचे भाव आले. त्यामुळे जमिनींच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपये मिळू लागले. परिणामी गुन्हेगारी टोळ्या या व्यवसायात सक्रिय होत गेल्या आणि त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले.
पुणे(Pune) शहरांमध्ये 2000 साली आयटी पार्क आले. पुणे-मुंबईची वाढलेली कनेक्टिव्हिटी, मोठे रस्ते, यामुळे उद्योगधंद्याचा विस्तार झाला. त्यामुळे बड्या बांधकाम व्यावसायिकांचे पुणेकडे लक्ष गेले. मग जमिनीचे वाद मिटवण्यासाठी, जमिनीवरती अवैध कब्जा करण्यासाठी या बिल्डर मंडळींकडून गुंडांना हाताशी धरण्यात आलं. यातून गुंडांना मोठी कमाई होऊ लागली त्यामुळे त्यांचे प्रस्थ पुणे शहरात वाढू लागले. मग या बांधकाम उद्योगासाठी जमिनीचे व्यवहार करणारे एजंट वाढले आणि व्यवहार मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली.
त्यामुळे काम मिळवण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. मग कंपन्यांमध्ये कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार? कंपन्यांचं स्क्रॅप कोण उचलणार ? कोण अधिक कॉन्ट्रॅक्ट मिळवणार? आयटीपार्क मधील कंपन्यांवर कोणाचा ताबा असणार ? कामगार वर्ग पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे राहणार ? यासाठी या टोळ्यांमध्ये वर्चस्व वादाचा संघर्ष सुरु झाला.
हा वाढता संघर्ष पाहिल्यानंतर राज्य सरकार याबाबतीत सजग झाले आणि पोलीस यंत्रणांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अंतर्गत टोळी युद्ध आणि पोलिसांच्या कारवायांमुळे 2008, 2015 च्या काळामध्ये टोळ्यांचा बऱ्यापैकी बिमोड झाला. तर अनेक टोळ्यातील म्होरके राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बनले. पांढरे कपडे घालून पांढरपेशी बनण्याचा प्रयत्न या गुंडांकडून करण्यात आला असला, तरी मूळ गुन्हेगारी या लोकांनी पूर्णपणे सोडली नसल्याचं पाहायला मिळालं. या गुन्हेगारीला राजकीय आश्रय मिळाल्याने गुन्हेगारी वेगवेगळ्या माध्यमातून पुण्यामध्ये अद्याप देखील वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edite by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.