
Pune News : शिक्षणाचे माहेरघर आणि सुसंस्कृत आणि शांतता प्रिय शहर म्हणून ओळख असलेले पुणे शहर केल्या काही वर्षात गुन्हेगारांचा ठाण बनलय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे (Pune) शहरात तब्बल 21000 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक असून यांची कुंडली पोलिसांकडून काढण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार वाढत आहे. त्याच्या कैकपटीने पुण्यामध्ये गुन्हेगारीचा विस्तार वाढताना पाहायला मिळत आहे. खून, जबरी, चोरी, मारहाण ,खंडणीखोरी बरोबरच सायबर गुन्हेगारी आणि विनयभंग, बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत.
सध्या पुण्यात कोयता गँग सक्रिय आहे. पुण्यातील उपनगराच्या परिसरांमध्ये त्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यांच्यातील काही जणांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. मात्र, या टोळीतील गुंड अजूनही पुण्यातील रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसत आहे. सातत्याने पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये गाड्यांची तोडफोडीची घटना या सर्रास घडत आहेत.
या सगळ्या घटनांमुळे शांतताप्रिय सुसंस्कृत कुणाची ओळख पोचली जात असून गुन्हेगारीचं तळ म्हणून पुण्याची नवी ओळख निर्माण होत आहे का? अशी शंका पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.दिवसाढवळ्या खून,छेडछाड, अत्याचार,मारहाण,तोडफोड, चोरी विनयभंग,सायबर क्राईम यांसारख्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी महिला सुरक्षिततेसह पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस (Police) आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुंडांची परेड घेतली होती. ड्रग्ज माफियांवर छापेमारी करून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी करून सराईतांवर धडक कारवाई केली. अनेकांवर मोक्का देखील दाखल केला. तसेच, सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्या गुंडांना दमही भरला होता. मात्र, सध्या परिस्थिती पाहता त्याचा फारसा काही परिणाम झाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांवर या कार्यवाही रोखण्याचा दबाव वाढत आहे त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 21 हजार गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली संकलित केली आहे. या गुन्हेगारांमध्ये विनयभंग, चोरी, मारहाण, बलात्कार, सायबर क्राईम, घरफोड्या या गुंडाचा समावेश आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.