Swarget Rape Case Update : दत्ता गाडेला गावात नेले पण 'त्या' दाव्याने पोलिस चक्रावले! दिवसभर शोध मोहीम

Datta Gade Allegedly Lost Phone : स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात त्यांचा मोबाईल हा महत्त्वाचा पुराव ठरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने पोलिस तपास करत आहेत.
Swargate Rape case
Swargate Rape caseSarkarnama
Published on
Updated on

Swarget Rape Case News : स्वारगेट बलात्कार प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे अर्धा ते पाऊण तास स्वारगेट एसटी स्थानकाच्या परिसरात घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमधून दिसून येत आहे. तसेच तो पोलिसाचे कपडे घालून देखील स्वारगेट बस स्थानकात फिरत असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. तरुणीवरील अत्याचारानंतर स्वारगेट परिसरात फिरताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती.

स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपीच्या विरोधात त्यांचा मोबाईल हा महत्त्वाचा पुराव ठरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने पोलिस तपास करत आहेत. दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली त्यावेळी त्याच्याकडे त्याचा मोबाईल नव्हता. शुक्रवारी पोलिसांनी दत्ताला त्याच्या गुनाट गावी नेले. तो ज्या शेतात लपला होता त्या 100 एकर परिसराची पोलिसांच्या फौज फाट्याने पोलिसांनी कसून तपासणी केली मात्र, दत्ता गाडेचा मोबाईल पोलिसांना मिळाला नाही.

Swargate Rape case
Shivsena UBT : येणार येणार साहेब नक्की येणार, पण तारीख नाही सांगणार! ठाकरेंचा पुणे दौरा वेटिंगवर, शिवसैनिकांचा जीव टांगणीला

आपले लोकेशन कळेल या भीतीने आरोपी दत्ताने आपला मोबाईल फोन तो लपलेल्या ठिकाणी फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, आपण मोबाईल फेकला नाही. आपल्या खिश्यातून पडल्याचा दावा आरोपीने केला आहे. पोलिसांच्या 40-45 जणांच्या पथकाने शोधून देखील मोबाईल सापडत नसल्याने दत्ताच्या दाव्याने पोलिस चक्रावले आहेत.

घराचीही झडती

पोलिसांच्या पथकाने दिवसभर दत्ता गाडे लपलेल्या शेताच्या परिसरात तपासणी केली. मात्र, मोबाईल सापडला नाही. दत्ताच्या घराची देखील झडती पोलिसांनी घेतली तसेच सहा जणांचे जबाब देखील नोंदवले. दत्ता ज्यांच्या घरी पाणी मागण्यासाठी गेला होता त्यांचाही जबाब नोंदवणाऱ्यांमध्ये समावेश आहे. तब्बल सात आठ अधिकारी आणि 40-45 पोलिस कर्मचारी यांनी मोबाईलच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Swargate Rape case
Dhananjay Mahadik : ज्यांची जमीन जाणार नाही ते पुढारपण करतायेत; खासदार महाडिकांनी पाटलांना सुनावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com