Ram Shinde  Sarkarnama
विशेष

Vidhan Parishad Speaker : भाजप शिवसेनेला आणखी एक धक्का देणार?; विधान परिषदेचा सभापती होणार फडणवीसांच्या मर्जीतील नेता!

Ram Shinde News : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक खाती ही भाजपकडे आली आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेतील महत्वाच्या खात्यावर आपला पक्षाचा नेता बसविण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 17 December : विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा आता विधान परिषदेकडे वळविला आहे. विधान परिषदेचे सभापतिपद (Vidhan Parishad Speaker) गेली दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्या पदासाठी शिवसेनेच्या नेत्या तथा उपसभापती नीलम गोऱ्हे ह्या इच्छुक असून शिवसेनेचीही तशी मागणी आहे. या सर्व घडामोडींमध्ये भाजपने मोठी खेळी खेळल्याचे मानले जात असून पक्षातील वरिष्ठ नेत्याला सभापतिपदी बसविण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती आहे. त्यासाठी सभापतिपदाची निवड उद्याच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या सभापतिपदी आपल्या पक्षाचा नेता बसवून भाजप (BJP) मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक खाती ही भाजपकडे आली आहेत. त्यानंतर आता विधान परिषदेतील महत्वाच्या खात्यावर आपला पक्षाचा नेता बसविण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत. त्या माध्यमातून सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. त्यातून या पदासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रा. राम शिंदे यांचे नाव सभापतिपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना सभापतिपद सोडावे लागल्यानंतर गेली दोन ते अडीच वर्षांपासून विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळख असलेल्या विधान परिषदेचे सभापतिपद रिक्त आहे. रामराजे यांची विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी मिळू शकलेले नाही. विधान परिषदेच्या सभापतिपदाचे काम सध्या परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे पाहत आहेत.

विधान परिषदेत सध्या भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे भाजपकडून सभापतिपदावर दावा केला आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि अजित पवार गटाच्या पेक्षा भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे भाजपला महायुतीमधून विरोध होण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण, शिवसेनेच्या मागणीकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचे नव्या घडामोडींवर दिसत आहे.

विधान परिषदेच्या सभापतिपदी नगर जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते प्रा. राम शिंदे यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राम शिंदे हे उद्या सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेनेला भाजप आणखी एकदा ठेंगा दाखविण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT