Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळांची 'या' मोठ्या पदावर वर्णी लागणार, भाजप नेत्याचा दावा

BJP Leader Claims New Role for Chhagan Bhujbal : "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना"; असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या भुजबळांनी थेट अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 17 Dec : "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना"; असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला.

मात्र, या नवीन सरकारमध्ये ओबीसींचे नेते अशी ओळख असलेल्या छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मंत्रि‍पदापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या भुजबळांनी थेट अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहे. शिवाय कालच ते नागपुरातील अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठलं होतं.

त्यानंतर नाराज झालेले भुजबळ काही मोठा निर्णय घेणार का? याबाबत तर्क वितर्क लढवले जात असतानाच भाजप (BJP) आमदार आशिष देशमुख यांनी भुजबळांबाबत मोठा दावा केला आहे. देशमुख यांनी छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं नसलं तरी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असून त्यांची राज्यपाल पदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा केला आहे.

Chhagan Bhujbal
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी फडणवीस सरकारचा पहिल्याच अधिवेशनात मोठा निर्णय, लवकरच पैसे मिळणार

तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणत्याही आमदारांमध्ये नाराजी नसल्याचंही देशमुख (Ashish Deshmukh) म्हटलं आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांची खरंच राज्यपालपदी नियुक्ती होणार का? आणि ती भुजबळांना ते मान्य होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. छगन भुजबळ यांची ओबीसी नेता म्हणून राज्यभरात ओळख आहे.

Chhagan Bhujbal
Vidarbha Politics : भाजप आमदार आशिष देशमुख करणार माजी मंत्र्याचीच 'नाकाबंदी'

तर भुजबळ यांना मंत्रि‍पदापासून वंचित ठेवल्यामुळे कालपासून राज्यभरात आक्रमक झालेल्या ओबीसी संघटनाकडून आंदोलन करत महायुतीचा निषेध केला जात आहे. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आहेत. तर मंत्रिपद डावलल्यामुळे भुजबळांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com